प्रगती विद्यामंदिर व ह भ प आनंदराव काशीद पाटील जुनिअर कॉलेज इंदोरी,वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

SHARE NOW

इंदोरी

 

Advertisement

दिनांक १० डिसेंबर व ११ डिसेंबर या दोन दिवसात प्रगती विद्यामंदिर इंदोरी प्रशालेतील स्नेहसंमेलन पार पडले.स्नेहसंमेलनाचे उद्घाटन नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. राज्यमंञी संजय बाळा भेगडे यांच्या उपस्थितीत सरस्वती पूजन व दिपप्रज्वलन करुन करण्यात आले.संमेलनाचे ध्वजारोहण सरपंच शशिकांत शिंदे यांचे शुभहस्ते झाले. याप्रसंगी प्रमुख वक्ते बालगंधर्व मंडळाचे अध्यक्ष सुरेश साखवळकर , दैनिक लोकमत चे सहसंपादक योगेश्वर माडगूळकर ,संस्थेचे सहसचिव विनायक अभ्यंकर ,शालेय समितीचे अध्यक्ष दामोदर शिंदे, संचालक महेश शहा,सोनबा गोपाळे ,मा. जिल्हा परिषद सदस्य प्रशांत ढोरे ,बबन ढोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप ढोरे, रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष श्रीशैल मेंथे, मोंडेलिज प्लांट मॅनेजर निशांत दुरवार ,सी . एस.आर फंड प्रमुख संदिप जोशी,सुनिल भोंगाडे ,बबन भसे , विलास भेगडे , उपसरपंच जयश्री सांवत, माजी उपसरपंच प्रशांत भागवत , दिनेश चव्हाण ,स्वप्नील शेवकर , संदिप नाटक , लतिका शेवकर , बाळासाहेब शिंदे,मल्हारी शिंदे , संदीप मगर माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष दत्ताञय घोजगे , कोषाध्यक्ष सुनिल दाभाडे ,राजेंद्र भेले,काकासाहेब काळे, ऋषिकेश लोंढे,दत्ताञय ढोरे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन , स्वागतगीताने करण्यात आली . विद्यार्थ्यांनी विविध न्रत्य सादर करून उपस्थितीतांची मने जिंकली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक महादेव ढाकणे यांनी केले. हस्तलिखित प्रकाशन सहसचिव विनायक अभ्यंकर यांनी केले. या प्रसंगी विज्ञान ,कला, रांगोळी व ग्रंथ अशी विविध दालने साकार केली त्यांची उद्घाटने करण्यात आली. प्रमुख वक्ते सुरेश साखवळकर यांनी आपल्या अमोघ वाणीने विद्यार्थ्यांना आई, वडील व शिक्षकांचे मार्गदर्शनाने यश संपादन करुन शाळेचा नावलौकिक वाढविण्याचे आवाहन केले . आपल्या सुरेल आवाजाने इंद्रायणी काठी या अंभगाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. संस्थेचे अध्यक्ष संजय भेगडे यांनी शिक्षण घेऊन मोठे व्हा व देशाचा नावलौकिक वाढविण्याचे आवाहन केले . महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मावळ व लोटस कंम्पुटर यांच्या वतीने श्वेता मोहिते, संतोष कदम व सुमती शिंदे यांना गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.क्रांती रत्न विष्णू गणेश पिंगळे विद्यार्थी रत्न पुरस्काराने स्वरूपा चव्हाण , रिद्धी संपकाळ व गौरी कांबळे या विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष संजय बाळा भेगडे यांनी सन्मानित केले.अनेक विद्यार्थ्यांनी बौद्धिक व क्रिडा स्पर्धेत यश मिळविले बद्दल सन्मानचिन्ह व प्रशस्तीपञक देऊन गौरविण्यात आले. संस्थेचे सचिव व पालक संतोष खांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक काकासाहेब भोरे , शिक्षक प्रतिनिधी रुपेश शिंदे, संमेलन प्रमुख विकास दगडे , प्रवीण राऊत , श्वेता मोहिते, सांस्कृतिक विभाग प्रमुख स्मिता गजभिव, मोहिनी ढोरे , शिक्षकेतर प्रतिनीधी दिपक डांगले विद्यार्थी प्रतिनिधी दिपक बेंढारी ,वैष्णवी शेटे,अनुष्का येवले, शिवानी गायकवाड व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. आभारप्रदर्शन संमेलन प्रमुख शारदा वाघमारे यांनी मानले . सुञसंचलन ज्येष्ठ शिक्षक सांस्कृतिक विभाग प्रमुख लक्ष्मण मखर व अश्विनी शेलार यांनी केले. संस्थेतील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक , ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांना स्नेह भोजन देण्यात आले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page