प्रशांत दादा भागवत युवा मंचाच्या उपक्रमाला कुस्ती क्षेत्रातील मान्यवरांचा पाठिंबा , मावळ केसरी कुस्ती स्पर्धेला अधिकृत मान्यता

SHARE NOW

मावळ

मावळ तालुक्यातील कुस्ती परंपरेला नवे बळ देण्यासाठी प्रशांत दादा भागवत युवा मंच तर्फे आयोजित “मावळ केसरी कुस्ती स्पर्धा” कार्यक्रमाला मावळ तालुका कुस्तीगीर संघाने अधिकृत मान्यता प्रदान केली. या मान्यता पत्र वितरण सोहळ्यास कुस्ती क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून स्पर्धेला उत्साहपूर्ण शुभेच्छा दिल्या.

 

या प्रसंगी ऑलिंपिक वीर मारुती अण्णा आडकडर महाराष्ट्र चॅम्पियन संभाजी राक्षे, मावळ तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खंडू भाऊ वाळुंज, कार्याध्यक्ष नागेश भाऊ राक्षे, महाराष्ट्र चॅम्पियन्स तानाजी भाऊ कारके, तानाजी भाऊ काळोखे आणि राकेश भाऊ सोरटे , तसेच संघाचे सचिव बंडू भाऊ येवले, स-सचिव पप्पू भाऊ कालेकर, कामगार केसरी दीपक भाऊ दाभाडे, सरपंच शंकर भाऊ देशमुख, तंटामुक्ती समिती अध्यक्ष धोंडिबा भाऊ आडकर आणि सरपंच भगवान लगड आदी मान्यवर उपस्थित होते.

 

या वर्षी विविध वजनगटांमध्ये कुस्ती स्पर्धांचे आकर्षक आयोजन करण्यात आले आहे.अशी माहिती मेघाताई भागवत यांनी दिली यामध्ये

Advertisement

१४ वर्षाखालील गटासाठी २२ ते ४२ किलो,

१७ वर्षाखालील गटासाठी ४२ ते ७० किलो,

तर वरिष्ठ गटासाठी ५७ ते १२५ किलो वजन गट निश्चित करण्यात आले आहेत.

 

याशिवाय महिलांसाठीही स्वतंत्र वजन गट ठेवून २५ ते ३० किलो, ३१ ते ३५ किलो, ३६ ते ४५ किलो, ४५ ते ५० किलो आणि ५० किलोपेक्षा पुढील वजन गटात स्पर्धा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे महिला कुस्तीगिरांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

 

ही भव्य स्पर्धा श्रीराम विद्यालयासमोर, नवलाख उंब्रे (मावळ) येथे आयोजित करण्यात आली आहे. मावळ येथील होतकरू कुस्तीगीरांसाठी ही एक मोठी संधी असून मान्यवरांच्या उपस्थितीने व संघाच्या अधिकृत मान्यतेने स्पर्धेची प्रतिष्ठा आणखी उंचावली आहे.

 

मावळच्या मातीतील कुस्ती परंपरा जपण्यासाठी आणि नवोदित खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी ही स्पर्धा मोलाची ठरणार आहे, अशी सर्वांकडून अपेक्षा व्यक्त होत आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page