*रोटरी सिटीच्या दिमाखदार सामुदायिक विवाह सोहळ्यात २० जोडपी विवाहबद्ध!*
*तळेगाव दाभाडे – रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी, आमदार सुनिल शंकरराव शेळके फाऊंडेशन आणि रोट्रक्ट क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने थाटामाटात सामुदायिक विवाह सोहळा रविवारी (दि. २८) थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील, मराठी शाळा प्रांगण तळेगाव दाभाडे येथे उत्साहात पार पडला. या विवाह सोहळ्यासाठी मावळ, मुळशी, जुन्नर, आंबेगाव, रायगड, श्रीगोंदा, मुंबई, पिंपरी, चिंचवड व पुणे या ठिकाणाहून एकूण २० वधू वर जोडपी विवाहबद्ध झाली.*
*या सोहळ्यातील वधू-वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी मावळचे आमदार सुनिल शेळके,माजी सभापती विठ्ठल शिंदे, पुणे जिल्हा बॅंकेचे संचालक माउली दाभाडे,संत तुकाराम साखर कारखाना उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाचे अध्यक्ष गणेश भेगडे, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती बाबुराव वायकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे,माजी सभापती निवृती शेटे,माजी नगराध्यक्ष रविंद्रनाथ दाभाडे,माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी,माजी सभापती सुहास गरुड, शिवाजी असवले, नारायण ठाकर यांच्यासह विविध राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.त्याचबरोबर रोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट ३१३१ चे २४-२५ चे गव्हर्नर रो.शितल शहा,२५-२६ चे गव्हर्नर रो.संतोष मराठे,२६-२७ चे गव्हर्नर रो.नितीन ढमाले व पुणे,पिंपरी चिंचवड येथील रोटरी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.*
*या विवाह सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे वधू-वरांना रोटरी सिटीच्या वतीने पूर्ण पोशाख, गॅस शेगडी, गोदरेज कपाट, संसारोपयोगी भांडी, शिलाई मशीन,टेबल फॅन,मनगटी घड्याळ,प्रत्येक वधूस सोन्याची नथ व जोडवी,याशिवाय दोन भाग्यवान जोडप्यांना २ गीर जातीच्या गायी तसेच तीन जोडप्यांना तीन मोबाईल फोन लक्की ड्रा द्वारे देण्यात आले.पूजा जंगले पुणे व अक्षय शेडे कुरुळी,पुणे तसेच योगिता मंडाळा मानखुर्द व विशाल सोनवणे चिंचवड या नवदाम्पत्याला गाय मिळाली असून तीन लकी ड्रॉ पद्धतीने बाबा मोबाईल शाॅपी पुरस्कृत मोबाईल १)आकांक्षा सोनवणे जुन्नर व किरण भालेराव जुन्नर २) योगिता मंडळा मानखुर्द व विशाल सोनवणे चिंचवड ३) दिपाली कांबळे माळवाडी इंदोरी व अक्षय गभाले आंबेगाव यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले.*
*अतिशय भव्य आणि दिव्य लग्न मंडपात सकाळी 11 पुरोहितांच्या उपस्थितीत साखरपुडा व हळदी समारंभ थाटामाटात संपन्न झाला हळदी समारंभात वधू वर पक्षाकडील वऱ्हाडी मंडळी व रोटरी सिटीचे सदस्य यांनी मनसोक्त आनंद घेतला. दुपारी १२ ते ३ या वेळात पंचक्रोशीतील पाच ते सहा हजार वऱ्हाडी मंडळी व नागरिकांनी सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला. दुपारी ३ वाजता भेगडे आळी येथील मारुती मंदिरापासून रथ, ढोल लेझीम पथक,बँड इ. सहाय्याने संपूर्ण गावातून दिमाखदार वर राजांची मिरवणूक काढण्यात आली*
*रोटरी सिटीच्या उपक्रमांची माहिती विशद करताना सर्व उपस्थितांचे स्वागत रोटरी सिटी चे अध्यक्ष सुरेश शेंडे यांनी प्रास्ताविकाद्वारे केले त्याचबरोबर प्रमुख पाहुणे व मान्यवरांचे सत्कार सन्मान चिन्ह, भरजरी वस्त्र देउन संस्थापक अध्यक्ष व प्रकल्प प्रमुख विलास काळोखे, अध्यक्ष सुरेश शेंडे, उपाध्यक्ष किरण ओसवाल, सेक्रेटरी भगवान शिंदे,समन्वयक दिलीप पारेख व रोटरी पदाधिकाऱ्यांच्या शुभहस्ते करण्यात आले.आमदार सुनिल आण्णा शेळके,माजी नगराध्यक्ष ॲड रविंद्रनाथ दाभाडे,किसान मोर्चाचे अध्यक्ष गणेश भेगडे यांनी वधुरांना शुभाशीर्वाद देताना रोटरीच्या समाज उपयोगी उपक्रमांचे कौतुक केले.संपूर्ण दिवसभर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेक्रेटरी भगवान शिंदे, संतोष शेळके, सुरेश दाभाडे,रो.प्रदीप टेकवडे यांनी केले.*
*कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विलास काळोखे,संजय मेहता, नितीन शहा, मनोज ढमाले, सुरेश धोत्रे,प्रदीप मुंगसे,दिपक फल्ले ,रितेश फाकटकर, कार्तिकी बानगुडे,हरिश्चंद्र गडसिंग, विश्वास कदम, सुरेश धोत्रे,विनोद राठोड,संग्राम जगताप, प्रसाद बानगुडे,संजय वाघमारे, संतोष परदेशी ,रामनाथ कलावडे, रघुनाथ कश्यप,हर्षल पंडित, निखिल महापात्रा, सुनील महाजन, दशरथ ढमढेरे, बसप्पा भंडारी, संजय चव्हाण, शरयू देवळे, वर्षा खारगे,संगीता शिरसाट,फस्ट लेडी सुनिता शेंडे,राकेश गरुड, मधुकर गुरव,विश्वास कदम,राजेंद्र कडलग,तानाजी मराठे, सौरभ मेहता,सूर्यकांत म्हाळसकर,मनोज कुमार नायडू, राकेश ओसवाल, प्रसाद पादिर, मनोज राठोड, प्रशांत ताये, सुनंदा वाघमारे, अर्जुन वारिंगे, स्वाती मुठे, हर्षद जव्हेरी, अवधूत साळुंके,रोशनी ओसवाल यांनी विशेष परिश्रम घेतले*