नारीशक्ती वंदना जागतिक महिला दिनाच्या निमित्त विविध क्षेत्रात काम करणारे महिलांचा सन्मान सोहळा भारतीय जनता पार्टी पक्ष कार्यालय तळेगांव दाभाडे येथे घेण्यात आला.
तळेगाव दाभाडे :
भाजपा महिला मोर्चा तळेगांव दाभाडे शहर यांच्या वतीने आयोजित नारीशक्ती वंदना जागतिक महिला दिनाच्या निमित्त विविध क्षेत्रात काम करणारे महिलांचा सन्मान सोहळा भारतीय जनता पार्टी पक्ष कार्यालय तळेगांव दाभाडे येथे घेण्यात आला.
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा मंगलताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व महिलांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित तळेगांव दाभाडे शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अशोक दाभाडे, तळेगांव दाभाडे शहर महिला मोर्चाच्या अध्यक्षा शोभा परदेशी,माजी नगरसेवक सचिन टकले,जेष्ठ नेत्या रंजनीताई ठाकुर, सरचिटणीस शोभा भेगडे, तनुजा दाभाडे, उपाध्यक्ष मुदुला भावे, चिटणीस नंदा दाभाडे,स्मिता पोरे, संध्या जाधव, माजी सौनिक आघाडीचे अध्यक्ष गजानन राजहंस, सोशल मीडियाचे अध्यक्ष ऋषिकेश सुतार, वैद्यकिय आघाडीचे अध्यक्षा सोनाली शेलार, साधना भेगडे, वंदना दाभाडे,वंदना काळोखे,तृप्ती भेगडे,अनिता भेगडे,जयश्री टकले, अनिता दाभाडे, विद्या भेगडे, अर्चना पंडीत, गौरी सावरकर, तळेगांव दाभाडे शहर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, विविध आघाडीचे, मोर्चाचे पदाधिकारी, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांचा गौरव करण्यात आला.
डाॅक्टर प्राची वाघ,डाॅक्टर वर्षा प्रविण माने, पुणे जिल्हा वारकरी सहित्य परिषद मावळ तालुका महिला अध्यक्षा सविता दाभाडे, शैक्षणिक क्षेत्रातील साधना बाळसराफ, कल्याणी घोडे, पत्रकार रेखा भेगडे, महिला बचत गटाच्या प्रमुख रमा राजहंस,वांगीकर, आशास्वयंसेविका मंदाकिनी साळवे, संगिता रणभरे, अध्यात्मिक क्षेत्रातील वैशाली निगडकर यांच्या नारी शक्ती वंदना जागतिक महिला दिनाच्या निमित्त सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा मंगलताई वाघ यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमांचे सुत्रसंचालन साधना भेगडे, प्रास्ताविक अशोक दाभाडे, आभार शोभा परदेशी यांनी केले.