*आमदार शेळके यांच्या सूचनेनंतर ठाकर वस्तीपर्यंत प्रथमच पोहचले तहसीलदार आणि बीडीओ* *नागरिकांच्या समस्या ऐकून दिली शासकीय योजनांची माहिती*

SHARE NOW

तळेगाव दाभाडे, २९ मे – तळेगाव दाभाडे शहर आणि सोमाटणे ग्रामपंचायत यांच्या मध्ये वसलेली ठाकर वस्ती ही प्रशासकीय दृष्ट्या त्रिशंकू स्थितीत असल्यामुळे आजपर्यंत दुर्लक्षित राहिली होती. मात्र, मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सूचनेनुसार आज या वस्तीला तालुका प्रशासनाने पहिल्यांदाच भेट दिली.

या दौऱ्यात तहसीलदार विक्रम देशमुख आणि गटविकास अधिकारी (बीडीओ) कुलदीप प्रधान यांनी ठाकर वस्तीतील नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्यावर उपाययोजना सुचवल्या. घरकुल योजना, संजय गांधी निराधार योजना, रेशनकार्ड, जात प्रमाणपत्र आदी विविध शासकीय योजनांची माहिती देऊन त्याचा लाभ कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

वस्तीतील नागरिकांचे प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिले होते. प्रशासनाचा हा दौरा ठाकर वस्तीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात असून, प्रत्यक्ष संवादातून विकासाचा मार्ग मोकळा होण्यास मदत होईल, असा विश्वास स्थानिकांनी व्यक्त केला.

Advertisement

दौर्‍यावेळी ग्रामसेवक खोमणे, आमदार कार्यालयाचे प्रतिनिधी सचिन वामन, शाम शेळके, अनिल जाधव, अशोक गावडे, अश्विन केदारी, राहुल जाधव, सुरेश केदारी, राजू गावडे आदी उपस्थित होते. स्थानिक महिला व ग्रामस्थही मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.

हा दौरा ठाकर वस्तीच्या सर्वांगीण विकासासाठी एक सकारात्मक पाऊल ठरले असून, प्रशासन व जनप्रतिनिधींमधील समन्वयाचे प्रत्यक्ष उदाहरण यातून दिसून आले आहे.

आरोग्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी प्रथमत आरोग्य शिबिर नंतर जात प्रमाणपत्र संजय गांधी योजनेचे कॅम्प या वस्तीवर सुरू करू . शासनाच्या विविध योजना राबवण्यासाठी सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा

विक्रम देशमुख- तहसिलदार मावळ


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page