इंद्रायणी महाविद्यालयामध्ये संविधान दिन उत्साहात साजरा!

SHARE NOW

तळेगाव:

२६ नोव्हेंबर २०२५इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी एपीआय श्री गणेश लोंढे यांनी सर्व विद्यार्थ्यांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या व 26/11 रोजी मुंबई हल्ल्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

कनिष्ठ विभागातील राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक आर. आर. डोके यांनी याप्रसंगी भारतीय संविधानातील मूलभूत तत्व, कर्तव्य, हक्क यांचा उलगडा केला. तसेच, अगदी लहानपणापासून विद्यार्थ्याच्या अभ्यासक्रमात संविधानाचा समावेश होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करत संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले. माणसा माणसा मधील संवाद भाषेच्या आधारावर न होता संवेदनाच्या माध्यमातून होणे आवश्यक असून राष्ट्र घडवण्यासाठी व सक्षम नागरिक तयार होण्यासाठी संविधानच उपयुक्त असल्याचे प्रतिपादन केले.

Advertisement

याप्रसंगी इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या माध्यमातून ‘ हर घर संविधान’ या उपक्रमाची घोषणा करत, इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे अध्यक्ष श्री. रामदासजी काकडे व संस्थेचे कार्यवाह श्री. चंद्रकांत शेटे यांच्या वतीने प्रत्येक विद्यार्थ्याला संविधानाची प्रत मोफत वाटली जाणार असल्याची ग्वाही दिली.

याप्रसंगी नाट्य विभागाच्या वतीने संविधानाच्या सादरीकरणावर आधारित ध्वनी चित्रफीत दाखवण्यात आली.

कार्यक्रमाला यशोदा महादेव काकडे इंजीनियरिंग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. साहेबराव पाटील, वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापिका आर. आर. भोसले, नाट्य विभाग प्रमुख प्रा. क्षिप्रसाधन भरड, प्रा. रोहित नागलगाव, प्रा. राजेंद्र आठवले, पर्यवेक्षिका संजना दिसले, कला विभाग प्रमुख प्रा. जाधव, तंत्र शिक्षण विभाग प्रमुख प्रा. नीता अहिरे, विज्ञान विभाग प्रमुख प्रा. खाडप आदी उपस्थित होते.

संविधान दिनाचे प्रास्ताविक प्रा मिलिंद खांदवे यांनी केले. तर संविधान वाचन व शपथ प्रा. योगेश घोडके यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. हर्षदा पाटील यांनी केले तर सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. कृष्णा मिटकर यांनी सर्वांचे आभार मानले.

राष्ट्रगीताच्या सामूहिक गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page