संविधान दिन व २६/११ शहीदांना आदरांजली कार्यक्रम उत्साहात संपन्न

SHARE NOW

देहूरोड : मुस्लिम विकास विचार मंच, देहूरोड शहर यांच्या वतीने संविधान दिन आणि २६/११ मुंबई हल्ल्यातील शहीदांना आदरांजली अर्पण करण्याचा विशेष कार्यक्रम कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालय येथे उत्साहात संपन्न झाला.

 

कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेच्या सामूहिक वाचनाने झाली. यानंतर संविधानाचे महत्त्व व मूलभूत तत्त्वे याबाबत ॲड. नितीन शील आणि ॲड. तन्वीर जहागीरदार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. २६/११ हल्ल्यातील शहीद जवान व नागरिकांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाला विशेष स्वरूप देण्यात आले.

Advertisement

 

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून आलमगिर यूसुफ कुरैशी, अब्दुल्ला मजिद शेख, बंदेअली अख्तरअली सैय्यद, नियामत शेख, हाजी हुसेनभाई गफूर शेख, के. एच. सुर्यवंशी, ज्येष्ठ पत्रकार अशोक कांबळे व प्रकाश कांबळे (रुईकर) उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे आयोजन मुस्लिम विकास विचार मंचाचे अध्यक्ष रज्जाक साहेबलाल शेख यांनी केले. नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व युवकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष उर्जा लाभली.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page