संविधानातल्या गोष्टी आपण किती पाळतो ,याचाही विचार आपण करावा – प्राचार्य : प्रदीप कदम

SHARE NOW

देहूगाव :

संविधान दिनाच्या निमित्ताने ,सर्व मानव जातीला समानतेचा अधिकार देणारे संविधान , डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या मसुदा समितीच्या अध्यक्षतेखाली निर्माण झालं , आणि ते आपण स्वीकारलं २६ जानेवारी १०५० ला ,त्याची अमलबजावणी झाली तो दिन आपण २६ जानेवारीला साजरा करतो ,परंतु सनविधांतल्या गोष्टी आपण किती पाळतो याचा विचार आपण करूयात ,असे प्राचार्य प्रदीप कदम यांनी देहूगाव येथे आपल्या व्याख्यानात सांगितले.

Advertisement

जगातील सर्वोत्तम राज्यघटना भारतीय संविधान दिन २६ नोव्हेंबर ७५ वा अमृत महोत्स ,देहू देहूरोड व परिसरात मोठ्यायत्साही आनंदी वातावरणात विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.तर २६ /११ मुंबई हल्ल्यातील शहिदांना आदरांजली अर्पण करण्यात आली .देहूगाव येथील विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती, प्रज्ञा बुद्धविहार कृती समिती यांच्या वतीने येथील डॉ.बाबसाहेब आंबेडकर चौकात संविधान दिन साजरा करण्यात आला.यावेळी प्राचार्य प्रदीप कदम ,देहूनगर पंचायतीच्या कार्यालयीन अधीक्षक प्रियांका कदम ,नगराध्यक्षा पूजा दिवटे माजी नगराध्यक्षा स्मिता चव्हाण ,प्राध्यापक विकास कंद ,माजी उपसरपंच सचिन साळुंके प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर यादव ,कन्या विद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता पासलकर ,प्रभारी प्राचार्या विद्या कांबळे , तसेच संत तुकाराम विद्यालयाचे विध्यार्थी ,विद्यार्थिनी ,शिक्षक वर्ग ,ग्रामस्थ उपस्थित होते.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page