मावळ लोकसभा उमेदवार संजोग वाघीरे पाटील यांच्या प्रचारार्थ कामशेत मध्ये पत्रकांचे वाटप.
कामशेत :
मावळ लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघिरे पाटील यांच्या प्रचारार्थ कामशेत मध्ये मच्छिमार्केट बाजारपेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक, पवनानगर रोड या भागात प्रचार दौरा काढण्यात आला त्यावेळी मा. ता उपाध्यक्ष संतोष राक्षे, शहर अध्यक्ष संतोष वीर, युवक अध्यक्ष सुरज पुरी, ओबीसी सेलचे अध्यक्ष अभिजित शिनगारे, अल्पसंख्यांक सेलचे मोईन खान आणि कार्यकर्ते तसेच शिवसेना पक्ष प्रमुख सतीश इंगवले, गणेशजी भोकरे, काँग्रेस पक्षाचे रोहिदास वाळुंज,राजू चितोडिया, कमल चितोडिया, बाबू वाघमारे, आजी, माजी शहर प्रमुख उपस्थित होते. प्रचारदारम्यात पत्रकांचे वाटप करण्यात आले.आणि मतदारांना निवडणूक चिन्हची ओळख करून देण्यात आली.