सर्जनशीलतेचा विद्यार्थ्यांनी ध्यास घ्यावा- कुलगुरू डॉ. मनीमाला पुरी.

 

 

वडगाव (मावळ ):

पिंपरी चिंचवड विद्यापीठ, साते, मावळ येथे

‘प्रोजेक्ट एक्सपोर्ट 2024’ चे शानदार उद्घाटन.

“सर्जनशीलता विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देत असते. हीच सर्जनशीलता माणसातील अंतर्भूत गुण शोधून त्याला नाविन्याकडे घेऊन जात असते. विद्यार्थ्यांनी अशाच सर्जनशीलतेचा ध्यास घेऊन छोटे-मोठे बनवलेल्या उपक्रमांचे पेटंट मध्ये कसे रूपांतर करता येईल, याचा बारकाईने विचार केला पाहिजे.”

असे मत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी चिंचवड विद्यापीठ साते मावळ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनीमाला पुरी यांनी काढले. प्रथम वर्षाच्या स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी विभागाने आयोजित केलेल्या ‘प्रोजेक्ट एक्सपोर्ट 2024’ च्या नुकत्याच पार पडलेल्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे, विभागप्रमुख आर. जी. बिरादार, प्रा. डॉ. स्वाती शिर्के, डॉ. करुणा भोसले, डॉ. सागर पांडे, प्रा. तेजश्री पवळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, हार्डवेअर, संगणक आणि माहिती तंत्रज्ञान अशा विविध विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी हायड्रोफोनिक्सवर आधारित आर्गीकल्चर ॲप्लिकेशन, ऑटोमॅटिक गॅस लीकेज सेन्सर, सॉफ्टवेअर आधारित ऑटो हॅकिंग सिस्टीम, इंटेलिजेंट चॅटबॉक्स यासारख्या विविध विषयावर नवीनतम तंत्रज्ञानावरील प्रकल्पांचे विद्यार्थ्यांनी प्रदर्शन केले.

प्र-कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे यांनी मावळातील साते येथील हे विद्यापीठ नवीन असले तरी पिंपरी चिंचवड विद्यापीठाने नवीन पिढीच्या इच्छुक अभियंत्यांसाठी एक मापदंड तयार केल्याची भावना व्यक्त करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या प्रदर्शनामध्ये 600 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. तर तांत्रिक कौशल्याचे प्रदर्शन करणारे 160 पेक्षा जास्त प्रकल्प या प्रदर्शनासत सादर करण्यात आले. या ‘प्रोजेक्ट एक्सपोर्ट 2024’ मध्ये वेगवेगळ्या विभागाचे प्रमुख तसेच विद्यार्थ्यांचा सिंहाचा वाटा असल्याची भावना या प्रकल्पाच्या समन्वयक डॉ. करुणा भोसले आपले मनोगत व्यक्त करताना व्यक्त केल्या.

यावेळी वेगवेगळ्या विभागातील विद्यार्थीही मोठ्या संख्येने प्रदर्शन पाहण्यासाठी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page