आळंदी माऊली मंदिरात हरिनाम गजरात होलिकोत्सव मंदिरात दर्शनास भाविकांची गर्दी

SHARE NOW

आळंदी  :

संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरासह शहरातील विविध मठ, मंदिर आणि घराघरांसमोर प्रथा परंपरांचे पालन करीत गुरुवारी ( दि. १३ ) धार्मिक मंगलमय वातावरणात होलीकोत्सव हरिनाम गजरात साजरा करण्यात आला. आळंदी परिसरात धुलवड दिनी शुक्रवारी ( दि. १४ ) पाणी वाचवा संदेश देत धुलिवंदन साजरी होत आहे.

माऊली मंदिरात नागरिक, भाविक, दर्शनार्थी यांची श्रीचे दर्शनासह होळी पूजन करण्यास मोठी गर्दी केली होती. यात महिला आणि मुलांची गर्दी लक्षणीय होती. यावर्षी होळी पूजन गुरुवारी आल्याने श्रींची गुरुवारची मंदिर प्रदक्षिणा पालखीची झाल्यावर नित्य नैमित्तिक धार्मिक कार्यक्रम हरिनाम गजरात झाले. अजानवृक्ष प्रांगणात होळी पूजन वेदमंत्र, हरिनाम जय घोषात पूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथजी, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, तुकाराम माने, मानकरी योगीराज कुऱ्हाडे, रामभाऊ चोपदार, सेवक कर्मचारी, साधक, भाविक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंदिरातील प्रथांचे पालन करीत हरीनाम गजरात मंदिरात होळी पूजन झाले. यावेळी व्यवस्थापक माऊली वीर यांचे सह वारकरी संप्रदायातील प्रथांचे पालन करीत परिश्रम पूर्वक होळीचे नियोजन केले. होळी पूजन वेदमंत्र, नामजयघोषात झाल्या नंतर होळी प्रज्वलीत करण्यात आली. महिला भाविक, मुले, नागरिकानी होळीस प्रदक्षिणा करीत नैवेद्य अर्पण करण्यास गर्दी केली.

Advertisement

माऊली मंदिरातील प्रथेप्रमाणे सेवक भीमराव वाघमारे यांच्या वतीने सनई चौघड्यांचे वादनाने मंत्र मुग्ध वातावरणात होलिकोत्सव अर्थात होळी सण संस्कृतीची जोपासना करीत आळंदी पंचक्रोशीत साजरा करण्यात आला. आळंदी पंचक्रोशीसह शहरात सर्वत्र होळी सण पारंपारिक रीतीने उत्साहात साजरा करण्यात आला. होळी पूजे नंतर पुरण पोळीचा महानैवेद्याचा महाप्रसाद वाढविण्यास परिसरातून मोठी गर्दी झाली होती. आळंदी शहरातील नागरिक माऊली मंदिरात होळीस नारळ प्रसाद, नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा यावर्षीही कायम राहिली. संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात श्रींचे दर्शनास गर्दी होणार असल्याने श्रीचे दर्शन व्यवस्थेचे नियोजन प्रभावी करण्यात आले होते. कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांना सुलभ दर्शन देण्याची व्यवस्था व्यवस्थापक माऊली वीर यांचेसह देवस्थानचे सर्व कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि पोलीस कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर, श्री हजेरी मारुती मंदिर, श्री रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेत हरिनाम गजरात परंपरेने होळी सण साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मोहन महाराज शिंदे, सचिन महाराज शिंदे संस्थेतील साधक विद्यार्थ्यानी होळी साजरी करण्यास परिश्रम घेतले. येथील गोपाळपुरातील ज्ञानाई माधुकरी अन्नछत्र मध्ये होळी सण उत्साहात साजरा करण्यात आला. मधुकरी वाटप केंद्रातील साधकांना पोळीचा महाप्रसाद वाटपकरण्यात आला. आळंदीत राहून शालेय शिक्षण बरोबर वारकरी शिक्षण घेत असलेल्या वारकरी साधक मुलांना येथे दैनंदिन मधुकरी वाटप केली जाते. यासाठी रामेश्वर महाराज मायकर विशेष परिश्रम घेत आहेत.

धुलवड दिनी शुक्रवारी ( दि. १४ ) पाणी वाचवा संदेश देत जनजागृती केली जाणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर घुंडरे पाटील यांनी दिली. ते म्हणाले, पाण्याचा वापर न करता विविध रंगी रंग एकमेकांना लावत धूलिवंदन साजरे करावे. यातून पाण्याची बचत करण्यासह प्रदूषण मुक्त धुळवड साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संत तुकाराम महाराज मंदिरा समोर देखील मोठ्या भक्तिमय वातावरणात होळीसं साजरा करण्यात आला


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page