श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त महापूजा व स्नेह मेळाव्याचे आयोजन
तळेगाव दाभाडे :
श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्था मंगळवारी(दि २०)३४ वर्ष पूर्ण करत असून ३५ व्या वर्षात यशस्वी पदार्पण (Talegaon Dabhade) करीत आहे.वर्धापन दिनानिमित्त श्री सत्यनारायण महापूजा व सभासद स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे आधारस्तंभ व पुणे जिल्हा सहकारी फेडरेशनचे सचिव संतोष भेगडे व संस्थेचे अध्यक्ष शरद भोंगाडे यांनी दिली.
संस्थेने आतापर्यंत मावळ तालुका परिसरात गरीब,गरजू छोटे-मोठे व्यावसायिक हातगाडीवाले, टपरीधारक,कामगार,उद्योजक यांना वेळोवेळी कर्ज देऊन समाजात त्यांची आर्थिक पत वाढवली आहे.
संस्थेचे संस्थापक,सहकार भूषण बबनराव भेगडे यांच्या (Talegaon Dabhade) मार्गदर्शनाखाली संस्थेचे आधारस्तंभ व पुणे जिल्हा सहकारी फेडरेशनचे सचिव संतोष भेगडे,संस्थेचे अध्यक्ष शरद भोंगाडे,सचिव अतुल राऊत तसेच सर्व संचालक मंडळाच्या सहकार्याने पुणे जिल्हा कार्यक्षेत्रात समर्थ, सक्षम सर्वसामान्यांच्या मनात अग्रगण्य स्थान कायम करणारी संस्था असा लौकिक मिळविला आहे.तसेच संस्थेची यशस्वी वाटचाल वेगाने चालू आहे.
वर्धापन दिनानिमित्त मंगळवार (दि २०) रोजी तळेगाव दाभाडे येथील मुख्य शाखेत हा कार्यक्रम होत असून सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळी संस्थेचे सभासद,खातेदार, हितचिंतक आदी सर्वांनी उपस्थित राहून सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे संस्थापक बबनराव भेगडे,आधारस्तंभ संतोष भेगडे, अध्यक्ष शरद भोंगाडे यांनी केले (Talegaon Dabhade) आहे.