हिंद विजय नागरी सहकारी पतसंस्थेच्या २०२४ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन!

SHARE NOW

तळेगाव दाभाडे (ता.२६) : येथील हिंद विजय नागरी सहकारी पतसंस्थेच्या २०२४ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन आज अॅडव्होकेट श्रीराम कुबेर, आणि तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनचे अध्यक्ष महेश भागीवंतच्या हस्ते आज करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.

Advertisement

यावेळी प्रमुख पाहुणे श्रीराम कुबेर यांनी आपल्या मनोगतात पतसंस्थेच्या कार्याचा गौरव करून पतसंस्थेच्या कामकाजाचे कौतुक केले. महेश भागीवंत यांनीही मनोगत व्यक्त करीत पतसंस्थेला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. पतसंस्थेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा विभावरी दाभाडे यांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. पतसंस्थेचे संस्थापक रवींद्रनाथ दाभाडे यांनी पाहुण्यांचा सन्मान करीत पतसंस्थेच्या सर्व कामांची माहिती यावेळी दिली.

सूत्रसंचालन पतसंस्थेचे सचिव कैलास भेगडे यांनी तर आभार पतसंस्थेचे सल्लागार हिम्मत पुरोहित यांनी मानले. यावेळी पतसंस्थेचे सदस्य अॅडव्होकेट निवृत्ती फलके, देवराम वाघोले, निजाम काझी, दत्तात्रेय कांदळकर आणि पतसंस्थेतील सर्व कर्मचारी व दैनंदिन बचत प्रतिनिधी उपस्थित होते.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page