गुरुवर्य ह.भ.प. किसन महाराज साखरे यांचे निधन

आळंदी : देहू आळंदी परिसर विकास समितीचे अध्यक्ष, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे माजी प्रमुख विश्वस्त गुरुवर्य ह.भ.प. किसन महाराज साखरे यांचे सोमवारी ( दि. २० ) रात्री आकाराचे सुमारास निगडी येथील लोकमान्य रुग्णालयात उपचारा दरम्यान हृदय विकाराने निधन झाले.

आळंदी येथील साखरे संप्रदायाचे नाना महाराज साखरे यांचे नंतर प्रमुख म्हणून जबाबदारी, संपूर्ण महाराष्ट्रात प्रवचन व कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन, वर्षानुवर्षे स्वस्तीश्री मासिकाचे प्रकाशन , महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकोबा पुरस्कार, संत साहित्याचे गाढे अभ्यासक, नित्यक्रमात साधकाश्रमात साधकांसाठी पाठ घेणे, त्यातून अनेक साधक तयार करून आज समाजात प्रवचनकार, कीर्तनकार म्हणून कार्यरत, देहू आळंदी विकास परिसर समितीच्या माध्यमातून डॉ. विश्वनाथ कराड सरांच्या समवेत इंद्रायणी घाटाची उभारणीत सक्रिय मोठे योगदान, महाराष्ट्रभर साखरे संप्रदायाचा मोठ्या प्रमाणावर शिष्य परिवार, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात दिंडी तसेच सोहळ्यात सहभाग, रंगनाथ महाराज परभणीकर धर्मशाळा विकासात मार्गदर्शक, परम महासंगणकाचे जनक डॉ. विजय भटकर यांच्या सहकार्याने ताम्रपटावर श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी, श्री ज्ञानेश्वरी मंदिर निर्माते, गेल्या ३५ वर वर्षे नेवासा ते आळंदी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी दिंडी पालखी पायी सोहळयाचे आयोजन, श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे विश्वस्त म्हणून सेवा रुजू, १९९७ मध्ये महाराजांच्या निर्मित ताम्रपटावर ज्ञानेश्वरी उद्घाटन समारंभ प्रसंगी राष्ट्राचे नेते शरद पवार स्वतः महाराज व तत्कालीन खासदार विदुराजी नवले, तत्कालीन आमदार स्व.नारायणराव पवार, ह. भ. प. शंकर बापू आपेगावकर यांचे माध्यमातून आळंदीत विकास कामे राबविली. लक्षवेधी इंद्रायणी नदी घाट विकासाचे ते शिल्पकार ठरले.

श्री संत साखरे महाराज परंपरेचे उत्तराधिकारी, वारकरी संप्रदायाचा चालता बोलता शब्दकोश, वेदांत व संत वांड.मय याचा अनुबंध आजन्म विशद करणारे अभ्यासू व्यक्तिमत्व, प्रचंड ग्रंथसंपदेवर लिखित स्वरूपाचे चिंतन प्रकाशित असणारे एकमेव व्यक्तिमत्व ह.भ.प.डॉ किसन महाराज साखरे अनंतात विलीन झाले. तत्पूर्वी त्यांचे पार्थिवाची हरिनाम गजरात आळंदीतून मिरवणूक काढण्यात आली. साधकाश्रम येथे त्यांचे अंत्यविधी समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचे उपस्तितीत शोकाकुल भक्तिमय, भावपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने वारकरी, भाविक, ग्रामस्थ, पदाधिकारी, शिष्य आणि साधक परिवार तसेच मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement

ज्ञानसूर्य मावळला, ज्यांचा ज्ञानेश्वरी श्वास होती, संपूर्ण जीवन ज्यांनी ज्ञानेश्वरीला दिले, ज्यांचे जगणे हे ज्ञानेश्वरी होते, ज्यांनी ज्ञानाची परंपरा चालवली असे वेदशास्त्र संपन्न, ज्ञानमहर्षी, गुरुवार्य हभप किसन महराज साखरे यांचे निधनाने संपूर्ण आळंदी परिसरावर शोककळा पसरली होती.

वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ अध्वर्यू कीर्तनकार, प्रवचनकार, तत्त्ववेत्ते म्हणून ह.भ.प. किसन महाराजांचे कार्य सर्व परिचित आहे. आळंदीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजनात त्यांची मोठी भूमिका होती.

त्यांचे पश्चात पत्नी, मुलगा ह. भ.प. यशोधन महाराज आणि चिदंबरेश्वर महाराज साखरे हे ही दोन मुले सुशिक्षित, सुसंस्कारित आणि राज्य परिसरात तसेच देश परदेशात कीर्तन, प्रवचनाचे माध्यमातून सर्व परिचित, दोन सुना, एक विवाहित कन्या यमुना कंकाळ, जावई, नातवंडे तसेच मोठा शिष्य परिवार, साधक विद्यार्थी असा परिवार आहे. त्यांनी प्रचंड मोठी धार्मिक, अध्यात्मिक ग्रंथ निर्मिती करून धर्मकार्य केले. आळंदी येथील देहू आळंदी परिसर विकास समितीचे अध्यक्ष या नात्याने इंद्रायणी नदी घाटाचे विकासात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. आळंदी देवस्थानचे विश्वस्त असता देखील त्यांनी विकास कामे केली. घाटांचे वैभवात त्यांनी वाढ केली. त्यांचे निधनाने वारकरी संप्रदायाची कधी हि न भरून येणारी हानी झाली असून हि पोकळी भरून येणारी नाही. संत वाड्मयाचे अभ्यासक, लेखक म्हणून त्यांचे योगदान मोठे आहे.

संत साहित्याचे अभ्यासक आणि वारकरी सांप्रदायातील जेष्ठ कीर्तनकार डॉ. किसनमहाराज साखरे (वय ८९) यांचे ह्दयविकाराने दु:खद निधन झाले. श्री माऊली ज्ञानोबाराय त्यांच्या आत्म्यास विलीन करून घेवो हीच प्रार्थना. आळंदी येथील साधकाश्रमात गुरू शिष्य परंपरेचा अंगीकार करून आदरणीय साखरे महाराजांनी संतसाहित्य, तत्वज्ञान, व्याकरणशास्र याचे अध्ययन केले. अशा महान विभूतीस श्री ओळख ज्ञानेश्वरी एक परीवार तसेच श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती आळंदी यांच्या तर्फे श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती, आळंदी अध्यक्ष प्रकाश काळे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित केली. अंत्यविधी प्रसंगी अंत्यविधी साठी आळंदीतील साधकाध्रमात Mit चे प्रमुख देहू आळंदी परिसर विकास समितीचे कार्याध्यक्ष डॉ. वि. दा. कराड, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर, नंदकुमार वडगावकर, डॉ. नारायण महाराज जाधव,

चैतन्य महाराज देगलूरकर, वेदमूर्ती चितळे गुरुजी, निलेश महाराज लोंढे, दत्तात्रय महाराज गायकवाड, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी विश्वस्त भावार्थ देखणे यांचेसह राज्यातून आलेले कीर्तनकार, प्रवचनकार, भाविक, भक्त, शिष्य, साधक उपस्थित होते. यशोधन महाराज साखरे , चिदंबरेश्वर महाराज साखरे यांनी अग्निडाग दिला. हरिनाम गजरात किसन महाराज साखरे अनंतात विलीन झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page