बनेश्वर महादेव मंदिरात चंदनउटी सोहळ्यानिमित्त मोगरा महोत्सव*
तळेगाव दाभाडे :
दि . ३० एप्रिल २०२५ रोजी तळेगाव दाभाडे येथील प्राचीन श्री बनेश्वर महादेव मंदिरात दरवर्षी प्रमाणे या वर्षीही महाअभिषेक करून ,सव्वा नऊ किलो चंदनाचा लेप लावून व आकर्षक मोगरा, गुलाब, झेंडू व विविध फुलांची सजावट व आकर्षक विद्युत रोषणाई करून चंदनउटी सोहळ्यानिमित्त मोगरा महोत्सव मोठ्या आनंदात व भक्तिभावात संपन्न झाला. बनेश्वर मंदिर हे ऐतिहासिक व प्राचीन मंदिर असून जागृत देवस्थान आहे. श्रीमती सरदार सरसेनापती उमाबाई दाभाडे सरकार कालीन मंदिर आहे. या कार्यक्रमास तळेगाव परिसरातील ५००० हुन अधिक भाविक भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी बनेश्वर सेवा मित्र मंडळ व नगरसेवक संतोषभाऊ भेगडे स्पोर्ट्स फाउंडेशन व मित्र परिवार यांच्या वतीने आयोजित केलेल्या महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घेतला. चंदन उटी सोहळ्याचे हे २५ वे वर्ष आहे. महाप्रसादानंतर रात्री मंदिरात एकतारी भजनाचा कार्यक्रम झाला. भजनासाठी मावळ, मुळशी व पुणे या शहरी व ग्रामीण भागातील एकूण १८ भजनी मंडळांनी सहभाग घेऊन रात्री १० ते पहाटे ०५ पर्यंत एकतारी भजनाचा कार्यक्रम केला व कार्यक्रमाची शोभा वाढवली. सदर कार्यक्रमास श्रीमंत सरदार सत्यशीलराजे दाभाडे सरकार , माँसाहेब वृशालीराजे दाभाडे सरकार, बबनराव भेगडे ( मा.अध्यक्ष मावळ राष्ट्रवादी काँग्रेस ), प्रकाश कदम, संभाजी शेळके, भाऊसाहेब रेडे, सोमनाथ भेगडे, सचिन भेगडे, चेतन भेगडे, शंकर भेगडे ,अरविंद गद्रे, बाळू वाजे, जीवन भेगडे, अक्षय रानवडे, अनिकेत वाघोले, धनराज माने, सिद्धेश भेगडे, ऋषिकेश मुरकुटे , प्रथमेश येळवंडे , स्वप्नील शिंदे , जय चौधरी , विशाल उभे , यादनिक जाधव , आदित्य मुरकुटे , ओम मुरकुटे , प्रणव भेगडे , अनुष्कार भेगडे , अभिषेक राघवाणी व बनेश्वर सेवा मंडळाचे सर्व कार्यकर्ते व तळेगाव शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.