*जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वीर जिजामाता प्राथमिक कन्याशाळेस दोन संगणक संच व दोन स्मार्ट टीव्ही भेट.*
तळेगाव दाभाडे :
दिनांक 10 मार्च वीर जिजामाता प्राथमिक कन्या शाळा क्र 5, तळेगाव दाभाडे ता.मावळ जि.पुणे शाळेस जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मा. आमदार श्री सुनिल अण्णा शेळके यांच्या माध्यमातून फिनिक्स मेकॅनो (इंडिया) प्रा.लि. उर्से या कंपनीकडून शाळेस सी. एस. आर. फंडातुन दोन संगणक संच ,दोन स्मार्ट टी. व्ही व इ.१री , 2री च्या विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य कीट भेट देण्यात आले.
दि – 10/03/2025 रोजी फिनिक्स मेकॅनो(इंडिया) प्रा. लि. कंपनीच्या एच. आर. अंकिता मॅडम यांच्या हस्ते सदर साहित्याचे उद्घाटन करण्यात आले.
सदर कार्यक्रमामध्ये कंपनीचे इतर अधिकारी, सर्व महिला कर्मचारी स्टाफ, शाळेतील मुख्याध्यापिका ,शिक्षक, शिक्षिका यांनी मिळून सावित्रीबाई फुले पुण्यतिथी कार्यक्रम घेतला.यानंतर कंपनीमार्फत शाळेतील सर्व मुलींना खाऊ वाटप करण्यात आला.
सर्व साहित्य शाळेस भेट दिल्याबद्दल नगर परिषर शिक्षण मंडळ च्या प्रशासन अधिकारी श्रीम. शिल्पा रोडगे मॅडम यांनीही आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संतोष बच्चे सर यांनी केले. मनोगतात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. विजया दांगट मॅडम यांनी माहिला दिनाचे महत्त्व सांगितले व शाळेस दोन संगणक संच, दोन स्मार्ट टीव्ही शैक्षणिक साहित्य दिल्याबद्दल आभार मानले. यावेळी आमदार कार्यालयातील श्री नितीन भाऊ पिंगळे, शाळा क्र. १ च्या मुख्याध्यापिका मिरघे मॅडम, शाळा क्र. 2 चे मुख्याध्यापक चांदे सर व वीर जिजामाता शाळेतील शिक्षक श्री सांगळे सर, श्री उकिरडे सर, श्री बच्चे सर,लांजेकर मॅडम, घाटे मॅडम, चौधरी मॅडम, मांढरे मॅडम, ठाकरे मॅडम उपस्थित होते.