*कै. गोपाळराव देशपांडे वनवासी विद्यार्थी वसतिगृह येथील विद्यार्थांना शालेय बॅग वाटप* *पुण्याचे मा.नगरसेवक आणि लायन्स क्लब ऑफ वडगांव चे संचालक आनंद चंद्रकांत छाजेड यांच्या वतीने उपक्रम संपन्न*

SHARE NOW

वडगाव मावळ :

वडगांव मावळ येथील कै.गोपाळराव देशपांडे वनवासी विद्यार्थी वसतिगृह येथील विद्यार्थांना शालेय बॅग वाटप करण्यात आले. लायन्स क्लब ऑफ वडगांव यांच्या माध्यमांतून पुण्याचे मा.नगरसेवक आणि लायन्स क्लब ऑफ वडगांव चे संचालक आनंद चंद्रकांत छाजेड यांच्या वतीने लायन्स क्लब प्रांत ३२३४ डी २ चे प्रांतपाल एम जे एफ ला.राजेश अगरवाल यांच्या शुभहस्ते हा उपक्रम संपन्न झाला.

 

लायन्स क्लब ऑफ वडगांव चे अध्यक्ष प्रशांत गुजराणी , सभापती गुलाबराव म्हाळसकर, गोपाळ नवजीवन केंद्राचे कार्याध्यक्ष दिलीपराव देशपांडे , लायन्स क्लब ऑफ वडगांव चे सचिव योगेश भंडारी, खजिनदार आणि गोपाळ नवजीवन केंद्राचे विश्वस्त नंदकिशोर गाडे, एम.जे.एफ सुनीत कदम , लायन्स क्लब ऑफ वडगांव चे मा.अध्यक्ष अमोल मुथा , दिलीप मुथा , संजय भंडारी , बाळासाहेब बोरावके , आदिनाथ ढमाले, मा.नगरसेवक शंकरराव भोंडवे, वडगांव भाजयुमो अध्यक्ष आतिश ढोरे, उपाध्यक्ष कुलदीप ढोरे, ला.नूतन मुथा , रेखा भंडारी , माधवी बोरावके , आदेश मुथा, वितराग मुथा आदी उपस्थित होते.

Advertisement

प्रांतपाल राजेश अगरवाल यांनी अभिनव उपक्रमाचे कौतुक करत भविष्यातील अत्यावशक असलेल्या नवीन उपक्रमांची माहिती दिली.

गुलाबराव म्हाळसकर यांनी आपल्या मनोगतात भविष्यात देखील लायन्स क्लब ऑफ वडगांव अशाच प्रकारच्या सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर राहील अशी ग्वाही दिली.

दिलीपराव देशपांडे यांनी गोपाळ नवजीवन केंद्राचे विविध उपक्रमांची माहिती देताना बॅग वाटप उपक्रमाचे कौतुक केले.

वडगांव नगरपंचायती चे मा. नगरसेवक भूषण मुथा यांनी संस्थापक अध्यक्ष ॲड.दामोदर भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली लायन्स क्लब ऑफ वडगांव करत असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page