“अमली पदार्थांना नाही म्हणा – निरोगी समाज घडवा”,तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनतर्फे अमली पदार्थ विरोधी जनजागृती उपक्रम
सोमाटणे :

तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीत अमली पदार्थ विरोधी सप्ताह अंतर्गत सोमाटणे ग्रामपंचायत परिसर तसेच स्टेशन चौक, तळेगाव दाभाडे येथे जनजागृती उपक्रम राबविण्यात आला.
Advertisement
या वेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधून अमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. तसेच, कुठल्याही ठिकाणी अमली पदार्थांची विक्री होत असल्यास त्याबाबत पोलीस स्टेशनला त्वरित कळवावे, असे आवाहन करण्यात आले.
या जनजागृती उपक्रमात दोन्ही ठिकाणी मिळून सुमारे ६० ते ८० नागरिकांनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रमावेळी पीएसआय मुल्ला साहेब, पोलीस उपनिरीक्षक पाटील मॅडम, पोलीस अंमलदार कातकडे, काशाळे तसेच दामिनी पथकातील सुनंदा जाधव उपस्थित होते.






