प्रांताधिकारी डॉ यशवंत माने यांच्या अध्यक्षतेखाली संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या नियोजनाची बैठक संपन्न झाली#

SHARE NOW

देहूगाव: श्री क्षेत्र देहू येथून पंढरपूर कडे १८ जून २०२५ रोजी प्रस्थान करणाऱ्या श्री संत तुकाराम महाराजांच्या ३४०व्या आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहू गावात शुक्रवार दिनांक ३०मे २०२५ रोजी नियोजन आढावा बैठक पार पडली. सदरील बैठक मुख्य मंदिर परिसरातील दर्शन बारी सभागृहात पार पडली. भाविक आणि वारकऱ्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने विविध शासकीय यंत्रणा. मंदिर संस्थान. आणि स्थानिक प्रशासन यांच्यात समन्वय साधण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत विविध विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषत देहू देहूरोड पालखी मार्गावरील खड्डे तत्काळ बुजवणे. येलवाडी देहू फाटा हा मार्ग दुरुस्ती करणे. अनगड शहा वली दर्ग्याजवळील कापूर ओढा पुलावरील तुटलेले कठडे दुरुस्त करणे. तसेच वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यावर उपाययोजना करणे. शुद्ध पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे. या बाबी बैठकीत मांडण्यात आल्या. वीज पुरवठा सुरळीत रहावा यासाठी ३ रोहित्राची व्यवस्था करणे.५०० मीटर केबल टाकणे. आणि सर्व डीपी सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन महावितरणचे संतोष झोडगे यांनी दिले. तसेच वीज खंडित झाल्यास पाणीपुरवठ्यावर होणाऱ्या परिणामाची गंभीर दखल घेत डॉ यशवंत माने यांनी आवश्यक दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत.डाॅ माने यांनी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व शासकीय विभागांनी एकत्रितपणे पुढील कामकाज राबवण्याच्या सूचना दिल्या असून यामध्ये रस्त्यावरील खड्डे रुजविणे .मुरूम टाकणे. स्वच्छता व कचरा व्यवस्थापन .आरोग्य व औषध उपचार सेवा. वाहतूक नियोजन .पोलीस बंदोबस्त .सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे. नियंत्रण कक्ष स्थापन करणे .आणि मुक्कामाच्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत स्पष्ट सूचना संबंधित विभागांना दिल्या आहेत. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी डॉ यशवंत माने होते. यावेळी पिंपरी चिंचवडचे अप्पर तहसीलदार जयराज देशमुख. श्री संत तुकाराम महाराज संस्थांचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे. देहूच्या नगराध्यक्षा पूजा दिवटे. पालखी सोहळा प्रमुख दिलीप महाराज मोरे. गणेश महाराज मोरे. वैभव महाराज मोरे. लक्ष्मण महाराज मोरे. विक्रमसिंह महाराज मोरे. उमेश महाराज मोरे. सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश कसबे. प्रभारी मुख्याधिकारी डॉ प्रवीण निकम यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या नियोजन बैठकीत श्री क्षेत्र देहूच्या पालखी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व संबंधित विभागात समन्वय साधण्याचे आवाहन करण्यात आले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page