तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलित कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पार पडला.
तळेगाव दाभाडे :
तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलित कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री.कमलेशजी कार्ले, संस्थेचे संस्थापक मा. श्री.चंद्रकांत काकडे,अध्यक्ष श्री.संदीप काकडे, सचिव श्री.प्रशांत शहा, खजिनदार सौ.गौरी काकडे, सचिव सौ. राजश्री म्हस्के, संचालिका सौ.सोनल काकडे ,संस्थेचे सदस्य श्री.सुभाष दाभाडे, सौ.मंगलताई काकडे , लायन्स क्लबचे उपस्थित मेंबर व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.ज्योती सावंत पर्यवेक्षिका सौ. शुभांगी वनारे,पर्यवेक्षिका सौ.कीर्ती कुलकर्णी उपस्थित होत्या.
प्रथम प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री.कमलेशजी कार्ले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. झेंड्याला मानवंदना देऊन राष्ट्रगीत गायले गेले. यानंतर विद्यार्थ्यांनी झेंडा गीत, राज्य गीत याचे सादरीकरण केले. यानंतर विद्यार्थ्यांनी मार्च पास्ट याचे उत्तम प्रदर्शन केले. कार्यक्रमाचा उत्साह वाढवण्यासाठी सिनियर गटातील विद्यार्थ्यांनी कवायत सादर केली.तसेच इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य व पिरामिडच्या वेगवेगळ्या रचना उत्तम पद्धतीने सादर केल्या.यामध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह व जोश दिसून येत होता.यावेळी प्रमुख पाहुणे मा.श्री.कमलेशजी कार्ले आपल्या भाषणात बोलताना ते म्हणाले की, देशाचा विकास हा नागरिकांच्या देशा विषयी असणाऱ्या जबाबदारीवर आधारित आहे. स्वातंत्र्यापूर्वीचा भारत आणि स्वातंत्र्यानंतर झालेला आधुनिक बदल हा भारताला प्रगतीपथावर नेण्याचे काम करत आहे. तसेच नवीन पिढीला शुभेच्छा दिल्या. यानंतर श्री.प्रशांत शहा यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, देशाला प्रगतीपथावर आणण्यासाठी प्रत्येक नागरिकाने संविधान व कायद्याचे पालन केले पाहिजे व सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.ज्योती सावंत यांनी भारतीय संविधानाविषयी माहीत दिली. व सर्वांना 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाळेमध्ये घेण्यात आलेल्या विविध वकृत्व स्पर्धांचे पारितोषिक वितरण करण्यात आले.यावेळी नर्सरी, ज्युनिअर,सिनियर गटातील कु.ईशानी दिवाण,कु.श्रीजीत मगर, कु. त्रिशा मोकळ,कु.योगेंद्र मरगूर,कु.ओवी जगदाळे,कु.आर्या गायकवाड या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत सादर केले. यावेळी शाळेच्या प्रांगणात सर्व विद्यार्थी व शिक्षक त्याचप्रमाणे पालकही बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीतील कुमारी परीधी पाटील व सपना चौधरी या विद्यार्थिनींनी केले. व त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम शालेय सहशिक्षिका सौ.अनुराधा वाघुले यांनी केले .कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात आला.