*कोस्टल रोडमुळे मुंबईकरांच्या वेळेची बचत होणार!*
मुंबई :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (कोस्टल रोड) व वरळी-वांद्रे सागरी सेतू (सी-लिंक) यांना जोडणार्या उत्तर वाहिनी पुलाचे लोकार्पण पार पडले. या किनारी रस्त्याच्या मुख्य उत्तर वाहिनी मार्गिकेसह, तीन इतर मार्गिकांचेही उदघाटन आज मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले.
कोस्टल रोडमुळे मुंबईकरांच्या वेळेची मोठी बचत होणार असून प्रदूषणापासूनही मुक्ती मिळणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले. कोस्टल रोड प्रकल्पाचे 94 % काम झाले असून फेब्रुवारी महिन्यात प्रभादेवी कनेक्टरचेही काम पूर्ण होऊन हा संपूर्ण रस्ता मुंबईकरांसाठी खुला होईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच या रस्त्याच्या बांधकामात सहभागी मुंबई महानगरपालिकेचे सर्व अधिकारी, अभियंते, कर्मचारी तसेच या प्रकल्पाचे कंत्राटदार व सर्व बांधकाम कर्मचारी यांचेही अभिनंदन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केले.
* लोकार्पण झालेल्या मार्गिका*
✅ मरीन ड्राईव्हकडून सागरी सेतूकडे जाणारा उत्तर वाहिनी पूल
✅ मरीन ड्राईव्हकडून प्रभादेवीकडे जाण्यासाठीची आंतरमार्गिका
✅ बिंदूमाधव ठाकरे चौकातून सागरी सेतूला जोडणारी आंतरमार्गिका
✅ वांद्रेच्या दिशेने जाणारी आंतरमार्गिका
*प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये*
🛣️ रस्त्याची लांबी – 10.58 किमी
🛣️ मार्गिका (4+4) बोगद्यांमध्ये (3+3)
🛣️ पुलांची एकूण लांबी – 2.19 किमी
🛣️ बोगदे- दुहेरी बोगद्यांची लांबी प्रत्येकी 2.072 किमी, अंतर्गत व्यास- 11 मीटर
🛣️ आंतरमार्गिका – 3, एकूण लांबी – 15.66 किमी
🛣️ एकूण भरावक्षेत्र – 111 हेक्टर
🛣️ नवीन विहारक्षेत्र – 7.5 किमी
🛣️ हरितक्षेत्र – 70 हेक्टर
🛣️ भूमिगत वाहनतळांची संख्या – 4,
🛣️ एकूण वाहनक्षमता – 1800 चारचाकी
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री आशिष शेलार तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.