श्री पोटोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त स्व. सोपानराव म्हाळसकर यांच्या स्मरणार्थ वारकरी संप्रदायात योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार तसेच समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांचे कीर्तन
वडगाव मावळ, दि.६ (प्रतिनिधी)
वडगाव मावळ येथील श्री पोटोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त स्व. सोपानराव म्हाळसकर यांच्या स्मरणार्थ गुरुवारी (दि.१०) वारकरी संप्रदायात योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच यावेळी समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांचे कीर्तन होणार आहे, अशी माहिती विश्वस्त भास्करराव म्हाळसकर यांनी दिली.
ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिराच्या प्रांगणात गुरुवारी सायंकाळी पाच वाजता हा सत्कार समारंभ होणार आहे. शंकर महाराज मराठे, पंकज महाराज गावडे, भंडारा डोंगर
दशमी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद व तुषार महाराज दळवी यांचा सत्कार करण्यात येणार आहे. खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, माजी मंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते हा सत्कार समारंभ होईल
याप्रसंगी माजी मंत्री मदन बाफना, आमदार शंकरराव जगताप, महेश लांडगे, शंकरराव मांडेकर, माजी आमदार रूपलेखा ढोरे, दिलीप मोहिते, माउली दाभाडे, बापूसाहेब भेगडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर निवृत्ती महाराज देशमुख यांचे कीर्तन होणार आहे.