तळेगाव दाभाडे येथे विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी
तळेगाव दाभाडे :
प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी मोठ्या उत्साहात आनंदामध्ये विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने संपूर्ण तळेगाव दाभाडे, शहरांमध्ये विश्वकर्मा जयंती सोहळा पार पडला, यावेळी विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमांचे दिवसभर आयोजन करण्यात आले होते सकाळी रुद्राभिषेक होऊन,श्री,विश्वकर्मा प्रतिष्ठापना करून पूजन करण्यात आले तसेच सत्यनारायणाची पूजा करण्यात आली ,त्यानंतर भजन सेवा झाली.
दुपारी बारा वाजता आरती होऊन जन्मोत्सव साजरा करण्यात आला यानंतर समाजातील मुलांच्या कलागुणांना वाव देण्याकरिता चित्रकला , नृत्य , गायन वादन लाठीकाठी अशा विविध गुणदर्शन कामाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी तळेगाव शहरातील राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांचे देखील सन्मान करण्यात आला आळंदी येथील व पुणे जिल्हा च्या समाजाच्या पदाधिकाऱ्यांचा देखील सन्मान करण्यात आला, मध्ये दिलीप दीक्षित, गणपत बारावकर, श्रावण जाधव सर, काळे ,गायकवाड. याप्रसंगी , प्रमुख उपस्थितांमध्ये तळेगावच्या वहिनीसाहेब सौ याज्ञसेनी सत्येंद्र राजे दाभाडे तसेच मा नगरसेवक संदीप जी शेळके , पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नगरसेविका संध्याताई वाघेरे, रवींद्र माने, उपस्थित होते, याप्रसंगी प्रतिवर्षी प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा समाज भूषण पुरस्कार प्रसिद्ध पखवाद वादक सौ अनुजा प्रदीप शिंदे व प्रतिष्ठानचे सचिव मधुकर सातबा भालेकर यांना प्रदान करण्यात आला यावेळी, यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रतिष्ठानच्या महिला अध्यक्ष अखिल महाराष्ट्र सुतार लोहार संघाच्या मा जिल्हाध्यक्ष म,नगरसेविका सौ शुभांगी ताई सुभाष शिरसाट यांनी केले
तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब निवृत्ती गरुड, उपअध्यक्ष सुभाषजी शिरसाट, खजिनदार- अशोकराव गरुड मधुकर भालेकर, शंकरराव गरुड, सुनील कदम चंद्रकांत हिरे ,शांत कुमार पांचाळ, जितेंद्र मिस्त्री तसेच उत्सव समितीचे अध्यक्ष संतोष पंडित , उपाध्यक्ष निलेश पालेकर खजिनदार -अमित मोरे ,सचिन गरुड सचिव -संदीप कदम कार्याध्यक्ष -अनिल भालेराव, संघटक- अमित भाग्यवंत संचालक -अनिल चौधरी, कार्यवाहक- सचिन सुरसे विनायक बारवकर व्यवस्थापक -संतोष सुरसे, उमेश बागुल सजावट -भूषण बाणराव, प्रसिद्ध प्रमुख महेश- भाग्यवंत, महिला पदाधिकारी दिपाली गरुड, सुनीता हिरे, तृप्ती बारवकर, शारदा भाग्यवंत, सारिका गरुड, अश्विनी बागुल ,लीना दिघे, ज्योती पंडित, शितल मोरे, यांनी संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यास मोठे योगदान दिले.