रोटरी सिटीतर्फे सुदुंबरे जि.प.शाळेस ३ स्मार्ट एल.ई.डी.टि.व्ही.समारंभपूर्वक प्रदान!*
सुदुंबरे :
रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी तर्फे सुदुंबरे मावळ येथील जि.प. शाळेस 43 इंची तीन स्मार्ट एलईडी टीव्ही संच समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले नवीन शैक्षणिक अभ्यासक्रमानुसार शालेय अभ्यासक्रमातील सर्व सहा विषय व वैकल्पिक विषयांचा अंतर्भाव असलेल्या ॲपच्या माध्यमातून डिजिटल शाळा अंतर्गत विद्यार्थ्यांना स्मार्ट टीव्हीच्या सहाय्याने विषय सहज आणि मनोरंजनात्मक,सोप्या पद्धतीने आत्मसात करता येतात व विद्यार्थ्यांची अभ्यासात गोडी निर्माण होते. अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरलेले तीन संच रोटरी सिटीच्या माध्यमातून सुदुंबरे शाळेला नुकतेच समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले.रोटरी सिटीचे अध्यक्ष सुरेश शेंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांची जन्मभूमी व पहिली शाळा असलेल्या सुदुंबरे मराठी शाळेस हे टीव्ही संच देण्यात आले*
*जि प शाळेतील विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये सर्वोच्च पदावर जाऊ शकतात त्यासाठी त्यांनी गुरुजन व आई-वडिलांच्या मार्गदर्शनाने खूप अभ्यास करावा जिद्द व चिकाटी बाळगून आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी असे प्रतिपादन रोटरी सिटी चे अध्यक्ष सुरेश शेंडे यांनी करताना स्मार्ट टीव्ही व नवीन शैक्षणिक अभ्यासक्रम अत्याधुनिक टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान यांचा वापर विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी होतो या उद्देशाने रोटरी सिटीच्या माध्यमातून आपण हे संच देत आहोत हे सांगताना रोटरीचा ११९ वर्षाचा यशदायी प्रवास कथन केला. समाज उपयोगी उपक्रम राबवताना शैक्षणिक, सामाजिक, आरोग्यविषयक, पर्यावरण पूरक उपक्रम राबवताना रोटरी सिटी समाज हिताचा सदैव विचार करते असे सेक्रेटरी भगवान शिंदे यांनी सांगताना रोटरी सिटीच्या उपक्रमांची माहिती दिली व सामुदायिक विवाह सोहळ्यातून गोरगरीब लोकांच्या मुलामुलींची लग्न लावून देण्याचा उपक्रम कथन करताना सामुदायिक विवाह सोहळ्याचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा असे आवाहन केले. तर रोटरी सिटीचे सर्व मेंबर्स अतिशय एकोप्याने काम करतात व प्रत्येक उपक्रम यशस्वी करतात असे प्रतिपादन डायरेक्टर प्रशांत ताये यांनी करताना रोटरीची कार्यपद्धती विषद केली*
*संस्थापक अध्यक्ष रो.विलास काळोखे, रोटरी सिटीचे उपाध्यक्ष रो.किरण ओसवाल,सरपंच मंगलताई गाडे, उपसरपंच बापुसाहेब बोरकर, शालेय समिती अध्यक्ष नितीन गाडे, उपाध्यक्षा माधुरीताई गाडे,रोटरीचे माजी अध्यक्ष रो.दिपक फल्ले,माजी सरपंच बाळासाहेब गाडे, दत्तात्रय गाडे, छायाताई यादव,स्वप्निल गाडे, संभाजी गाडे इ.मान्यवरांनी उपक्रमाचे कौतुक करताना विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानयुक्त शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.*
*कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे तंत्रस्नेही अध्यापक संतोष पवार यांनी केले तर सूत्रसंचालन अध्यापक प्रतीक्षित कांबळे यांनी केले शाळेच्या मुख्याध्यापकांनी सर्वांचे आभार मानले रो. मनोज कुमार नायडू, अध्यक्ष रो. सुरेश शेंडे व शिक्षण प्रेमी नागरिक कार्तिक राव यांनी तीन टीव्ही संच देणगी स्वरूपात दिले*
*रो.मनोज नायडू,रघुनाथ कश्यप,रो.विश्वास कदम,रो.संतोष परदेशी,रो.प्रदीप मुंगसे,रो.रामनाथ कलावडे,रो.दशरथ ढमढेरे,रो.मधुकर गुरव,रो.रितेश फाकटकर,रो.राजु कडलग,रो.बसाप्पा भंडारी, रो.तानाजी मराठे,सरपंच, उपसरपंच, शालेय समिती सदस्य, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक इ.नी उपक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.*