संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप न मिळाल्याने मागण्या मान्य न झाल्याने प्रस्तावाच्या प्रतिक्षेत लॉन्ग मार्च!
लोणावळा :
महाराष्ट्रातील,सारथी, बार्टी,महाज्योति,या संस्थेतील २०२२ व २०२३या वर्षातील संशोधक विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ति न मिळाल्याने शासन स्तरावर विद्यार्थ्यांची दखल न घेतल्याने , पी. एच. डी. नोंदनी होऊन दोन वर्षापेक्षा अधिक का
अधिक दिवस होऊन सुद्धा २०२२/२०२३ या वर्षातील विद्यार्थी यांना फेलोशिप न मिळाल्याने त्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले. झालेले नुकसान विचारात घेता शासना पर्यंत आपल्या भावना पोचविन्यासाठी या संशोधक विध्यार्थ्यांनी दि.२४ जून रोजी फुलेवाडा पुणे ते मंत्रालय असा लॉन्गमार्च आयोजित केला होता यात वरील संस्थाकडे अर्ज करीत असले कल्यानेटसंस्थांकडे अर्ज करीत असलेल्या व पात्र असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना नोंदनी दिनांक पासुन फेलोशिप मिळावी ही प्रमुख मागणी होती.मंत्री गिरिश महाजन यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन मागण्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचा व मुख्यमंत्री यांच्याशी बैठकीचे आश्वासन दिले.त्या नुसार विद्यार्थ्यांनी लॉन्ग मार्च स्थगित करण्याचा निर्णय घेतला सी. एम. यांच्याशी चर्चाही झाली या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णयाचे आश्वासन दिले मागण्या मान्य करण्याचा प्रस्तावाचे ही आदेश दिले होते . आणि आज विद्यार्थी याच प्रस्तावाच्या प्रतिक्षेत आहेत विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण झाले यामुळे स्थगित केलेले आंदोलन पुनः नव्याने स्थगित केलेल्या ठिकाणापासुन सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथुन सुरू केले असल्याचे विद्यार्थ्यानी सांगितले.या अंदोलनात महाराष्ट्रातील सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, मजूर अशा कुटुंबातील विद्यार्थ्यांना मानसिक तनावातुन जावे लागत आहे .तरी सरकारने यांचा विचार करून विद्यार्थ्याना न्याय द्यावा . यासाठी हे विद्यार्थी दि.२५ जून नंतर पुण्याहून मंत्रालय येथे लॉन्ग मार्च पायी निघाले आहे दि 15 जुलै लोणावळ्यात छ.शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले ,या सर्व महापुरूषांना पुष्पहार अर्पण करून पुढ़िल वाटचाल मंत्रालयाकडे निघाले .
या लॉन्ग मार्च साठी विद्यार्थी ,विद्यार्थिनी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.