व्यवसायात सातत्य आणि चिकाटी महत्त्वाची – सौ. अश्विनी सोनगावकर
तळेगाव दाभाडे :
व्यवसाय करताना सातत्य आणि चिकाटी असेल तर तो हमखास यशस्वी होतो, असे मत गोल्डन प्रिंट हाऊस, पुणेच्या सौ. अश्विनी सोनगावकर यांनी व्यक्त केले. त्या रूट सेट संस्था आयोजित “मशरूम लागवड” या दहा दिवसीय मोफत व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रमात बोलत होत्या.
या कार्यक्रमाला गोल्डन प्रिंट हाऊस, पुणेचे श्री. प्रवीण सोनगावकर, रूट सेटचे संचालक श्री. प्रवीण बनकर, प्रशिक्षक श्री. हरीश बाव चे आणि प्रशिक्षिका सौ. मनीषा गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे संचालक श्री. प्रवीण बनकर यांनी संस्थेच्या कार्याबाबत आणि व्यवसायासाठी आवश्यक बाबींविषयी सविस्तर माहिती दिली.यावेळी गोल्डन ग्राफिक्सचे श्री. प्रवीण सांगोलकर यांनी उद्योग क्षेत्रातील अनुभव सांगताना असे प्रतिपादन केले की, कोणताही व्यवसाय करताना उत्पादन आणि गुणवत्ता याकडे लक्ष दिल्यास व्यवसाय यशस्वी होतो. कोणत्याही व्यवसायात शॉर्टकट नसतो, जिद्द आणि कष्टाच्या जोरावर व्यवसाय केला तर तो आर्थिक स्थैर्य आणि यश देते.
या प्रशिक्षणासाठी पुणे जिल्ह्यासह आजूबाजूच्या परिसरातील अनेक प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन आणि सूत्रसंचालन प्रशिक्षक श्री. हरीश बाव चे यांनी केले.






