बेकायदेशीर सावकारी नि बेधुंद नशा करून रस्त्यावर फिरणाऱ्या समाजविघातक प्रवृत्तीला आळा घाला, लोणावळा शहर भाजपाच्या वतीने शहर पोलिसांना निवेदन 

SHARE NOW

लोणावळा –

लोणावळा शहरामधील रस्त्यांवर मध्यरात्रीनंतर नशेमध्ये फिरणाऱ्यांवर आळा घालण्या संदर्भात तसेच शहरात सुरू असलेल्या बेकायदेशीर सावकारी व्यवसाय करणाऱ्या आणि गरीब जनतेला वेठीस धरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याबाबत लोणावळा शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं लोणावळा पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी शहराध्यक्ष अरूण लाड, भाजपचे जिल्हा कार्यकारणी सदस्य दीपक कांबळे, संघटन मंत्री अर्जुन पाठारे, सरचिटणीस बाबू संपत आणि युवक अध्यक्ष प्रथमेश पाळेकर हे उपस्थित होते. रात्री अपरात्री अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक दारू व इतर नशेच्या पदार्थांचे सेवन करत भरधाव वेगाने बाईक व कार चालवत फिरत असतात.  त्यामुळे अनुचित प्रकार घडून गुन्हेगारी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकाराला वेळीच आळा घालावा अशी मागणी लोणावळा शहर भाजपच्या वतीनं लेखी निवेदनद्वारे करण्यात आली.

Advertisement

त्यासोबतच  भाजपने दिलेल्या निवेदनात लोणावळा शहरात  बेकायदेशीर सावकारी करणाऱ्यांवर देखील कडक कारवाई करण्याबाबत निवेदनात विनंती करण्यात आली आहे. लोणावळा शहरामध्ये अनेक गोरगरिबांना वीस टक्के एवढ्या प्रचंड व्याजाच्या दराने काही लोक पैसे देऊन त्यांच्याकडून चेक अनामत म्हणून घेतात व तो चेक बाउन्स करून तुमच्यावर पोलीस केस करू अशी धमकी देऊन चढ्या दराने व्याजाचे पैसे वसूल करतात अशा काही तक्रारी आढळून आल्या असून नागरीक घाबरून तक्रार करण्यासाठी पुढे येत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या चेक बाउन्सची तक्रार आल्यास त्वरित समोरच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल न करता प्रकरणाची पूर्ण खातरजमा करून नंतरच योग्य त्या व्यक्तीवर पुढील कारवाई करावी अशी मागणी शहर भाजपने केली आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page