आढले बु. येथे कृषि विभागा मार्फत तालुका कृषि अधिकारी दत्तात्रय पडवळ ह्यांच्या मार्गदर्शनाखाली भात बिजप्रक्रिया प्रात्यक्षिक
वडगाव (मावळ):
खरीप 2024 आढले बु येथे कृषि विभागा मार्फत तालुका कृषि अधिकारी दत्तात्रय पडवळ ह्यांच्या मार्गदर्शनाखाली भात बिजप्रक्रिया प्रात्यक्षिक घेण्यात आले. ह्यावेळी मंडळ कृषि अधिकारी नागनाथ शिंदे, सहाय्यक कृषि अधिकारी अक्षय ढूमणे ह्यांनी उपस्थित राहून प्रात्यक्षिक करून दाखवले व बिजप्रक्रियेचे महत्व शेतकऱ्यांना पटवून दिले व सर्व शेतकऱ्यांना भात बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी असे आव्हान केले. चंद्रकांत पाथरट ह्यांच्या शेतावर हे प्रात्यक्षिक घेण्यात आले.

⭕बियाणे जमिनीत पेरणीपुर्वी जमिनीतुन किंवा बियाण्यातुन पसरणारे विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच बियाण्याची उगवण क्षमता वाढवीण्यासाठी व रोपे सतेज आणि जोमदार वाढविण्यासाठी बियाण्यांवर वेगवेगळी जैविक व रसायनिक औषधांची प्रक्रिया केली जाते. याला बिजप्रक्रिया असे म्हणतात.
⭕भात पेरणी करण्याअगोदर जैविक बिजप्रक्रिया करणे आवश्यक आहे
जमिनीतून व बियाण्याद्वारे पसरणाऱ्या रोगांचा उदा. मर रोग आणि मूळ कूज इ. प्रादुर्भाव टाळता येतो.
बियाण्याची उगवण क्षमता वाढते.
रोपे सतेज व जोमदारपणे वाढतात.
पिकाच्या उत्पादनात वाढ होते.
बिजप्रक्रियेसाठी कमी खर्च येतो, त्यामुळे ही कीड/रोग नियंत्रणाची किफायतशीर पध्दत आहे.
*भाताची उगवण क्षमता वाढविण्यासाठी,
*भात उत्पादनात वाढ होण्यासाठी,
*भात रोपे वाढ चांगली होऊन भात लावण्यासाठी लवकर येते

⭕भात जैविक बिजप्रक्रिया करणे
250 ग्रॅम जीवाणू संवर्धनाचे पाकीट (ऍझोटोबॅक्टर , PSB) 10किलो बियाण्यास वापरावे. एक लिटर गरम पाण्यात 50 ग्रॅम गूळ टाकून द्रावण तयार करावे. हे द्रावण थंड झाल्यावर त्यामध्ये 250 ग्रॅम जीवाणू संवर्धन टाकून बियाण्यास हळुवारपणे लावावे. नंतर बियाणे सावलीत सुकवावे व या बियाण्याची पेरणी ताबडतोब करावी. जीवाणू संवर्धनाची प्रक्रिया बुरशीनाशकाची प्रक्रिया केल्यानंतर करावे.
या खरीप हंगामात चांगले पीक हाती येण्यासाठी शेतक-यांनी बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी असे मार्गदर्शन शेतकऱ्यांना करण्यात आले.






