राजे शिवराय प्रतिष्ठाणच्या वतीने ‘दारू नको, दुध प्या ‘ उपक्रम
पुणे: राजे शिवराय प्रतिष्ठान शैक्षणिक, सामाजिक,सांस्कृतिक कार्य महाराष्ट्र राज्य व सारथी रुग्णहक्क जनसेवा ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने भारती विद्यापीठ परिसरात व्यसनमुक्ती अभियान राबविण्यात आले.भारती विद्यापीठ येथील सरहद चौकात ‘ दारू नको, दुध प्या ‘ तरुणाईतील व्यसनाधिनता दूर करण्याकरिता अभिनव उपक्रम व नूतनवर्षाभिनंदन उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन व पोलीस बांधव यांचे सौजन्य लाभले.
व्यसनाधीनतेत भरकटलेल्या तरुणाईला व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्यसनामुळे आपलं आयुष्य आणि कुटुंब उध्वस्त होतात याची जाणीव तरुणाईत रुजायला हवी. व्यसनात धुंद होऊन नव्या वर्षाचे स्वागत करण्यापेक्षा जगण्यात धुंद होऊन आनंदाने स्वागत करायला हवे अशी माहिती आयोजक किरण घोरतळे पाटील यांनी दिली.
यावेळी कार्यक्रमाचे आयोजक राजे शिवराय प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे सचिव किरण घोरतळे पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त विजय कुंभार, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे,आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पुणे पोलीस सोसायटीचे उपाध्यक्ष आकाश फासगे,सारथी रुग्णहक्क जनसेवा ट्रस्टचे दिपक चौघुले,डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पुणेचे योगेश कापरे पाटील, दीपराज सावंत, कुलदीप नाईकनवरे,अनिल चौगुले, हरिभाऊ दळवी,दया सरोदे, ज्ञानेश्वर कोकाटे, अनिता चौघुले, पद्मजा गव्हाणे, सागर कारंडे, दिपक शिंदे, विशाल म्हस्के आदी मान्यवरांसह परिसरातील युवक उपक्रमात सहभागी झाले होते.






