कृषीकन्यांनी घेतला भात लागवाडीचा प्रत्यक्षात अनुभव
मावळ :
डॉ.डी .वाय.पाटील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय आकुर्डी येथील कृषी कन्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत बेबड ओहळगावात कृषी विषयासाठी भात लागवाडीचा प्रत्यक्षात अनुभव घेतला..या उपक्रमात ग्रामीण कृषी कार्यानुभव या कार्यक्रमांतर्गत कृषीकन्या प्रियंका घुंबरे,सानिका तांबिले, सृष्टी ताकवणे, उत्कर्षा भोसले, सिद्धी गायकवाड, स्नेहा राऊत या कृषी अभियानात सहभागी झाल्या आहेत .
बेबडओहोळ मधील प्रगतशील शेतकरी श्री. मिलिंद हरिभाऊ घारे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आम्हाला भात लागवडीची संपूर्ण माहिती दिली व तेथील कामगारांनी भात लागवडीचा प्रत्यक्ष ज्ञान आम्हाला दिलं.
या कार्यक्रमासाठी डॉ. डी. वाय .पाटील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.डी .जगताप , उपप्राचार्य डॉ.एस .एन .पाटील आणि प्राध्यापक अमृता कदम यांचे मार्गदर्शन लाभले आहे .






