इंटरनॅशनल ह्युमन राईट्स अॅम्बॅसेडर ऑर्गनायझेशन आणि माहिती अधिकार, पोलिस मित्र व पत्रकार संरक्षण सेना तर्फे मा. श्री. गणेश ज्ञानेश्वर शिंदे यांची आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष व राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती
राष्ट्रीय आणि अंतराष्ट्रीय:
सामाजिक कार्यात सातत्याने उल्लेखनीय योगदान देणारे मा. श्री. गणेश ज्ञानेश्वर शिंदे यांची राष्ट्रीय आणि अंतराष्ट्रीय अशा नावाजलेले प्रतिष्ठित संस्थांकडून दुहेरी नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या या सन्मानामुळे सामाजिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.
इंटरनॅशनल ह्युमन राईट्स अॅम्बॅसेडर ऑर्गनायझेशन *(IHRAO)* या जागतिक स्तरावरील संस्थेच्या वतीने मा. श्री. गणेश ज्ञानेश्वर शिंदे यांची आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष *(International Working President)* म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेचे अंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अविनाश धनंजय सकुंडे यांच्या स्वाक्षरीने हे नियुक्तीपत्र देण्यात आले.
या नियुक्तीद्वारे मा. श्री. गणेश ज्ञानेश्वर शिंदे यांच्यावर मानवाधिकार, सामाजिक न्याय व जागतिक शांततेसाठी संस्थेच्या विविध उपक्रमांचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
तसेच, माहिती अधिकार, पोलिस मित्र व पत्रकार संरक्षण सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने देखील मा. श्री. गणेश ज्ञानेश्वर शिंदे यांची राष्ट्रीय अध्यक्ष या मानाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेचे संस्थापक व आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अविनाश सकुंडे यांनी त्यांना हे नियुक्तीपत्र प्रदान केले.
मा. श्री. गणेश ज्ञानेश्वर शिंदे यांनी आपल्या नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त करताना सांगितले की —
> “संघटनांच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांचा आवाज बुलंद करणे, मानवाधिकारांचे रक्षण करणे आणि पत्रकार तसेच पोलीस मित्रांच्या हक्कांचे संरक्षण करणे हे माझे प्रमुख ध्येय असेल. लोकशाही मार्गाने समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याचे कार्य मी प्रामाणिकपणे करीन.”
या दुहेरी नियुक्तीबद्दल मा. श्री. गणेश ज्ञानेश्वर शिंदे यांचे विविध सामाजिक संस्था, कार्यकर्ते, पत्रकार आणि नागरिकांनी मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांच्या नेतृत्वामुळे संघटनांच्या कार्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.






