राज्यस्तरीय प्रेम काव्यमैफल उत्साहात संपन्न

पिंपरी चिंचवड :

नक्षत्राचं देणं कायमंच, भोसरीच्या वतीने नुकतेच राज्यस्तरीय प्रेम काव्यमैफलल व फुलोरा प्रेमाचा या काव्यसंग्रह प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम अतिशय उत्साहात सायन्स पार्क चिंचवड येथे संपन्न झाला. यावेळी कवी वादळकार यांच्या “प्रेम क्लिनिक” या थिएटर शो च्या कवितांचा कार्यक्रमही संपन्न झाला .

 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक व गझलकार प्रा. तुकाराम पाटील होते .तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक समाजसेवक सुभाष चव्हाण होते. बोल्ड कवी म.भा. चव्हाण आणि सुप्रसिद्ध चित्रकार सुहास जगताप ,सौ.जया बोरकर, सिराज मुल्लानी,सुनिल जाधव, भाऊसाहेब आढाव, यशवंत घोडे इत्यादी अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

वृक्षाला पाणी घालून पर्यावरण संदेश देत कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले

प्रेम काव्यमैफीलीचे अध्यक्ष तुकाराम पाटील म्हणाले की, नक्षत्रांचे देणे काव्य मंच ही एक “नक्षञाचं देणं काव्यमंच अशी एकमेव संस्था आहे की ,जी कवींच्या हक्काच्या आणि सन्मानासाठी गेले २४ वर्ष सातत्यपूर्ण काम करत आहे. या संस्थेच्या वाटचालीचा मी एक स्वतः एक साक्षीदार आहे. सातत्यपूर्ण धडपड करणारी आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारी ही कार्यक्षम संस्था आहे .कवींना न्याय देण्यासाठी अशा व्यासपीठाची समाजाला गरज आहे .समाजाने कवीला जपले पाहिजे. एक तास कवितेचा कवी तुमच्या भेटीला.. हा जो उपक्रम राबवत आहे .यातून अनेक भविष्यातील कवी घडतील अशा प्रकारचा आशावाद त्यांनी व्यक्त केला. जाती-धर्माची बंधने झुगारून माणसाने प्रेमाने माणुसकी जपली पाहिजे.” अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

Advertisement

 

कार्यक्रमाचे उद्घाटक समाजसेवक सुभाष वाल्हेकर याप्रसंगी म्हणाले की ‘”कवीच्या कविता या पुस्तकात न राहता. त्या वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे .यासाठी संस्थेने काव्यसंग्रह प्रकाशन आणि एक तास कवितेचा हा जो उपक्रम राबवला आहे तो स्तुत्य आहे.

बोल्ड कवी म.भा. चव्हाण म्हणाले की,” कवींनी आपली प्रतिभा ही जागृत ठेवून, प्रेमाचा आविष्कार हा नेहमी करत राहावा. ज्याला प्रेयसीचा स्पर्श झाला आहे .त्याची आयुष्याची बाग फुलली आहे. म्हणून या राज्यस्तरीय प्रेम काव्य मैफलमध्ये प्रेमाच्या विविध कवितांचा सादरीकरण झाले.

प्रेम काव्य मैफिल च्या संयोजनामध्ये अण्णा जोगदंड, भाऊसाहेब आढाव, यशवंत घोडे, डॉ.गिरीश सपकाळ,मनोज सरदार इत्यादींनी कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये पुढाकार घेतला आणि कार्यक्रम यशस्वी केला.

या प्रेम काव्य मैफलीमध्ये पद्याकर वाघरुळकर,अशोक वाघमारे,सौ अनुराधा इंगवले, नितीन भोसले, विलास कुंभार,शांताराम सोनार,सरदार मनोज,बबन चव्हाण,दत्ताञय भोसले,सौ.कमल आठवले,प्रशांत निकम,आनंद गायकवाड,संभाजी रणसिंग,,भरत जोशी,अशोक सोनवणे ,बशीर मुलानी प्रतिभा किर्ती कर्वे इ. सादरीकरण करुन मैफलची रंगत वाढविली.

काव्यमैफीलीची सांगता विश्वगीत पसायदानाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. राजेंद्र सोनवणे यांनी केले .आणि आभार प्रदर्शन कवी यशवंत घोडे यांनी मांडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page