अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित ) श्री दत्त जयंती निमित्त अखंड नाम, जप,यज्ञ सप्ताहाचे आयोजन
तळेगाव दाभाडे:
सिद्धिविनायक प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री गणेश मोहनराव काकडे यांच्या सहकार्याने श्री स्वामी समर्थ मंदिरासमोर समर्थ नगर डी पी रोड तळेगाव दाभाडे (स्टेशन) या ठिकाणी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित श्री दत्त जयंती निमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचे आयोजन दिनांक 9 ते 16 डिसेंबर या दरम्यान केले आहे.
यामध्ये रविवार दिनांक 8 डिसेंबर रोजी ग्रामदेवता सन्मान यज्ञ भूमी पूर्वतयारी मंडल मांडणी केली जाणार आहे. आणि सोमवार दिनांक 9 डिसेंबर रोजी मंडल स्थापना, अग्निस्थापना, स्थापित देवता हवन, मंगळवार दिनांक 10 डिसेंबर नित्यस्वाहकार, श्री गणेश याग /मनोबोध याग, बुधवार दिनांक 11 डिसेंबर रोजी नित्यस्वाहकार, गीताई याग, गुरुवार दिनांक 12 डिसेंबर रोजी नित्यस्वाहाकार, श्री स्वामी याग, शुक्रवार दिनांक 13 डिसेंबर रोजी नित्यस्वाहाकार, श्री चंडीयाग शनिवार दिनांक 14 डिसेंबर रोजी नित्य स्वाहाकार, श्री रुद्र याग, मल्हारी याग रविवार दिनांक 15 डिसेंबर रोजी नित्य स्वाहाकार, बली पूर्णआहुती श्री दत्त जन्मोत्सव, सोमवार दिनांक 16 डिसेंबर रोजी श्री सत्यदत्त पूजन व अखंड नाम, जप,यज्ञ सप्ताह सांगता व महाप्रसादाचे आयोजन केले आहे. तरी परिसरातील नागरिकांनी सामुदायिक गुरुचरित्र पारायण नोंदणीसाठी दिलेल्या नंबर वर संपर्क करावा.