निधन वार्ता भागाबाई दिगंबर भेगडे यांचे निधन
तळेगाव दाभाडे:
दिवंगत माजी आमदार दिगंबर भेगडे यांच्या पत्नी भागाबाई दिगंबर भेगडे (वय 70) यांचे आज गुरुवार दिनांक 5 डिसेंबर रोजी निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, अण्णासाहेब भेगडे, जनार्दन भेगडे हे दिर, पुतणे नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. इंदोरी- उर्से जिल्हा परिषद गट भाजपचे अध्यक्ष मनोहर भेगडे व उद्योजक प्रशांत भेगडे यांच्या त्या मातोश्री, भाजपचे माजी अध्यक्ष रवींद्र आप्पा भेगडे यांच्या चुलती तर देहूरोड कँटोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष रघुवीर शेलार यांच्या त्या आत्या होत्या.