पवना धरण क्षेत्रात पावसाचा जोर सुरुच दुपारी २ नंतर ८०० क्युसेसने विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

SHARE NOW

पवनानगर:

पवना धरण क्षेत्रात पावसाचा जोर सुरुच असल्याने. अशात आज सोमवार (दि.१८आँगस्ट) रोजी पवना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. आज दि.१८ दुपारी २ वाजता एकुण ८०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग पवनानदी पात्रात करण्यात आला आहे. त्यामुळे पवना नदीच्या जलपातळीत वाढ झाली असून नागरिकांनी सावध रहावे, अशी सुचना पवना धरण पूरनियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.

Advertisement

पवना नदी काठच्या सर्व नागरिकांना सूचित करण्यात येत आहे.की पवना धरण गुरुवार दि.१८ आँगस्ट रोजी दुपारी १ च्या आकडेवारी नुसार ९७.४५ टक्के क्षमतेने भरलेले आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर लक्षात घेता विज निर्मिती ग्रुहद्वारे पवना नदीमध्ये ८०० क्यूसेक्स विसर्ग करण्यात आला आहे. धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण पाहता आणि आवकानुसार पवना धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग पवनानदी पात्रात करण्यात येईल.तरी पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलवण्यात यावेत. सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती दक्षता घ्यावी व पाटबंधारे विभागास सहकार्य करावे ही विनंती.असे आवाहन पवना धरण पूरनियंत्रण कक्षाकडून करण्यात आले आहे.पावसाचा जोर कमी जास्त झाल्यास बदल केला जाईल.अशी माहिती पवनाधरण विभागाकडून देण्यात आली आहे.

 


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page