गोल्डन रोटरीचा हिमोग्लोबिन तपासणीत ऐतिहासिक दिवस 

SHARE NOW

तळेगाव दाभाडे

गोल्डन रोटरीच्या नारीशक्तीच्या नेतृत्वाखाली राबवलेला हिमोग्लोबिन प्रोजेक्ट हा खऱ्या अर्थाने इतिहास घडवणारा ठरला.

एकाच दिवशी ११ ठिकाणी कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करून एकूण १८०९ विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली.

या उपक्रमाच्या यशासाठी योगदान देणाऱ्या गोल्डन रोटरीच्या सर्व टीम सहकाऱ्यांचे, नर्सिंग स्टाफ,आशा वर्कर्स तसेच सहभागी सर्व शाळांचे मनःपूर्वक आभार.

अशीच सेवाभावी, समर्पित व यशस्वी वाटचाल पुढेही अखंड सुरू राहो, हीच सदिच्छा!

सहभागी शाळा व संस्था :

श्री भैरवनाथ विद्या मंदिर, वराळे,

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वराळे,

नगरपरिषद माध्यमिक विद्यालय क्र. ६, तळेगाव स्टेशन,

थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील शाळा क्र. २,

Advertisement

संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा क्र. ६, तळेगाव स्टेशन,

कलाश्रम कॅरिंग हॅन्ड्स, आंबी,

सरसेनापती उमाबाई दाभाडे प्राथमिक कन्या शाळा क्र. ४,

थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील शाळा क्र. १,

वीर जिजामाता प्राथमिक कन्या शाळा क्र. ५,

नगरपरिषद माध्यमिक विद्यालय क्र. २,

लोकमान्य टिळक प्राथमिक शाळा क्र. ३, तळेगाव एस.टी. स्टँड,

कार्यक्रमाचे यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष संतोष परदेशी,उपाध्यक्ष प्रशांत ताये,सेक्रेटरी प्रदीप टेकवडे, मेडिकल डायरेक्टर डॉक्टर सौरभ मेहता प्रकल्प प्रमुख प्रकल्प प्रमुख दिपाली शिंदे सह प्रकल्प प्रमुख दीक्षा वायकर व रोटरी गोल्डन चे सर्व सदस्य यांनी प्रयत्न केले.

आरोग्यदायी भविष्याकडे – सेवेतून समाजबांधिलकी!


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page