तळेगाव दाभाडेतील ऐतिहासिक ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज दीपोत्सव भक्तिमय वातावरणात भव्य आयोजन
तळेगाव दाभाडे:
तळेगावच्या इतिहासात आणि भावविश्वात विशेष स्थान असलेल्या श्री डोळसनाथ महाराज यांच्या दीपोत्सवाचे यंदा भव्य दहावे वर्ष उत्साहात साजरे होत आहे. परंपरा, भक्ती आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक ठरलेला हा दीपोत्सव त्रिपुरारी पौर्णिमा बुधवार दिनांक ५ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ६.३० वाजता साजरा होणार आहे.
या निमित्ताने श्री डोळसनाथ नागरी सह. पतसंस्था मर्यादित व माजी नगरसेवक संतोषभाऊ भेगडे स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रमुख पाहुणे म्हणून अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून सर्व नागरिकांना व भगिनींना सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे वैशिष्ट्य
ऐतिहासिक नगरदेवता श्री डोळसनाथ महाराजांच्या मंदिरात दीपप्रज्वलन सोहळा
पारंपरिक पद्धतीने सजवलेले दिवे, फुलांची आरास आणि मंदिराची भक्तिभावाने सजावट
नगरातील ऐतिहासिक व धार्मिक स्थळांच्या प्रतिकृतींचे दर्शन
जसे की — छत्रपती श्री शिवशंभु स्मारक, सरसेनापती उमाबाईसाहेब दाभाडे सरकार स्मारक, बनेश्वर महादेव मंदिर, मरिमाता मंदिर, पार्श्व प्रज्ञालय मंदिर, पाच पांडव मंदिर, पाताळेश्वर शिव मंदिर, बालाजी मंदिर इत्यादी.
सांस्कृतिक आकर्षण
संध्याकाळी भक्तिरसाने ओथंबलेली ‘अभंग भक्तिगीत सुरेल मैफल’ या शीर्षकाखाली सुप्रसिद्ध गायक विशालजी ससाळ (इंस्टा फेम) आणि गायिका सोनल विशाल ससाळ यांचा संगीत कार्यक्रम होणार आहे. महाराष्ट्र संगीत नाट्य अकादमी पुरस्कारप्राप्त या जोडप्याची सुमधुर भक्तिगीते ‘विठ्ठल आवडी प्रेम भावो’ या स्वरूपात रसिकांना आनंद देणार आहेत.
भव्य फुलांची आरास आणि स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद
नागरिकांसाठी नामांकित कलाकारांकडून फुलांची आकर्षक सजावट तसेच स्वादिष्ट भोजनाची मेजवानी ठेवण्यात आली आहे
प्रसिद्ध शंकरवाडीची भेळ व पाणीपुरी, तसेच चविष्ट वडापाव, डोसा व स्पेशल तळेगावचा प्रसाद यांचा आनंद सर्वांना घेता येईल.
संयोजक :
श्री. संतोष छबुराव भेगडे (माजी नगरसेवक व आधारस्तंभ श्री डोळसनाथ नागरी सह. पतसंस्था मर्या.)
शरद बबनराव भोंगाडे (अध्यक्ष, श्री डोळसनाथ पतसंस्था)
अमित अरूण भसे( खजिनदार. श्री डोळसनाथ पतसंस्था)
समिर शंकरराव भेगडे.( उपाध्यक्ष.श्री डोळसनाथ पतसंस्था)
सर्व उपस्थित नागरिकांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
भक्तिभाव, एकात्मता आणि परंपरेचा संगम असलेल्या या दीपोत्सवात तळेगाव दाभाडे नगरी पुन्हा उजळून निघणार आहे.






