“तारे जमीन पर ” पदमश्री डॉ डी वाय पाटील आंतर शालेय व खुला गट चित्रकला स्पर्धेस उत्साही प्रतिसाद
आकुर्डी :

दि १७ ऑक्टोबर, पदमश्री डॉ डी वाय पाटील साहेब ( दि २२ ऑक्टोबर २०२५ ) यांच्या ९० व्या वाढदिवसा निमित्त आयोजित भव्य चित्रकला स्पर्धेत “तारे जमीन पर ” ची अनुभुती मिळाली . डी वाय पाटील शैक्षणिक संकुलात डॉ डी वाय पाटील कॉलेज ऑफ अप्लाईड आर्टस् & क्राफ्ट्स , आकुर्डी च्या वतीने स्पर्धेचे आयोजन केले होते, यात परिसरातील अमृता विद्यालयम आणि ज्युनियर कॉलेज, अश्विनी इंटरनॅशनल स्कूल, ब्लॉसम पब्लिक स्कूल, केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल, सिटी प्राईड स्कूल, डी वाय पाटील ज्ञानशांती स्कूल,जीजी इंटरनॅशनल स्कूल, इंदिरा युनिव्हर्सिटी, कौशल्य वर्ल्ड स्कूल, मातृ विद्यालय इंग्रजी माध्यम शाळा, माउंट सेंट एन हायस्कूल तळेगाव दाभाडे, नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूटऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल, पोदार इंटरनॅशनल स्कूल, ऋषी गुरुकुलम, सरस्वती विश्व विद्यालय आंतरराष्ट्रीय शाळा, एस.बी. पाटील पब्लिक स्कूल, एसएम डी.वाय. पाटील स्कूल, एसएमपी इंग्रजी माध्यम शाळा, एसएनबीपी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, सेंट अँड्र्यूज हायस्कूल, सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी, द स्टेपिंग स्टोन स्कूल, कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे विल्लू पूनावाला हायस्कूल, कमलनयन बजाज स्कूल, डी वाय पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी. ई. यांत समावेश होता,
३० पेक्षा जास्त शाळांनी सहभाग नोंदविला. अनेक शाळांमध्ये प्रथम सत्राच्या परीक्षा सुरु होत्या तरीही भरपूर प्रतिसाद मिळाल्याने संयोजकाने समाधान व्यक्त केले. संकुलात सकाळी ६. ३० वाजल्या पासूनच चिमुकल्यांची व पालकांची लगबग सुरु झाली होती . सकाळी ७ वाजता स्पर्धेला प्रत्यक्षात सुरवात झाली. आंतर शालेय गटांमध्ये – प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक , कनिष्ठ महाविद्यालयिन गट, व खुला गट अश्या ४ गटांमध्ये स्पर्धा संपन्न झाली . सर्व गट मिळून २६०० पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागा नोंदविल्याची माहिती प्राचार्य जयप्रकाश कलवले यांनी दिली .
शालेय चित्रकला स्पर्धा सुरु केल्याचे हे तिसरे वर्ष आहे, प्रत्येक वर्षी विध्यार्थ्यांचा व शाळेचा सहभाग वाढतच आहे. चित्रकला , सृजनशील व कल्पकता या मध्ये शालेय जीवनातूनच मोठ व्यासपीठ मिळवून देण्याचा उद्धेश या मध्ये आहे , गेली २१ वर्षांपासून उपयोजित कलेमध्ये दर्जेदार शिक्षण देण्यासाठी महाविद्यालय परिचित आहे . कला क्षेत्रामध्ये असणाऱ्या संधी याची ओळख पालकांना या वेळी होत असते .
प्रत्येक गटातील विजेत्यांना संकुलाचे संचालक रिअल ऍडमिनरल अमित विक्रम , मुख्यवितीय अधिकारी बिपीनबिहारी शर्मा , प्राचार्य गीता पिलाई यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. तसेच सर्व परिक्षकांचे व शालेय कला शिक्षकांचे सत्कार ही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . उत्सफूर्त सहभागा बद्धल शाळेंना सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले.
परीक्षक म्हणून जेष्ठ चित्रकार व माजी कला शिक्षक श्री कामठे , श्री मिलिंद मिसाळ, जेष्ठ परीक्षक श्री वकील, श्री.संजय विसपुते यांनी परीक्षण करून न्याय देण्याचा प्रयंत्न केला. सृजन व कल्पक कलाकृर्ती ची निवड करताना कसोटो लागल्याची भावना परीक्षकांनी व्यक्त केली .
चेरमन श्री सतेज पाटील , विश्वस्त तेजस पाटील , यांनी उपक्रमाचे कौतुक केले. डी वाय आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनीष भला , संचालक रिअल ऍडमिनरल अमित विक्रम , मुख्यवितीय अधिकारी बिपीनबिहारी शर्मा यांनी मार्गदर्शन केले.
प्रसंगी संकुलातील विविध महाविद्यालयातील सर्व प्राचार्य उपस्थित होते. सहभागी विद्यार्थ्यां सोबतच मोठ्या प्रमाणात कलाशिक्षक व पालक वर्ग ही उपस्थित होता , उत्कृष्ट नियोजन व नाविन्यपूर्ण अयोजना बद्धल संयोजकांचे कौतुक केले आणि आभार मानले .
उपक्रम संयोजन समितीचे प्रा. राजेश पुजारी , प्रा संकेत भालारे, श्री अमोल हरगुडे यांनी आयोजन केले , डॉ नितीन तावरे , प्रा शंकर आडेराव , प्रा पल्लवी पांढरे , डॉ राहुल वेलदोडे, प्रा. कृष्णा सावंत , प्रा. समता बेंद्रे , प्रा. सुरभी गुळवेलकर , प्रा. विजय लक्ष्मी पिंजन , प्रा . श्याम पगारे, श्री एम एल जगदाळे , श्री अमेंद्र देशमुख , सौ दर्शना गायकवाड , स्नेहल मगरे , श्री जगन्नाथ चौगुले ई . शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विध्यार्थी संसदेचे सदस्य व एनसीसी च्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन कु. क्रिजल जैन व अनन्या शाह यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा राजेश पुजारी यांनी केले






