*रोहन अपूर्वा पारीख ग्रुपच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप…*

SHARE NOW

मळवंडी ढोरे :

गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून मावळ तालुक्यातील मळवंडी ढोरे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना रोहन अपूर्वा पारीख ग्रुप, मुंबई या संस्थेच्या वतीने स्पोर्ट्स ड्रेस, स्कूल बॅग, योगा मॅट,वह्या, चित्रकला वह्या, कंपासपेटी,संगणक टेबल व सतरंजी इत्यादी साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. संस्थेच्या संचालिका नीलाबेन पारिख,अतुल पारेख,आश्वी पारेख, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गुलाब वरघडे,प्रा.आदित्य लोहाना, विरेंद्र यादव, हर्षद भोसले, महेश झुंजार,सरपंच गोरख ढोरे, अध्यक्ष संभाजी ढोरे, उपसरपंच प्रकाश ढोरे, माजी अध्यक्ष शंकर ढोरे, कविता ढोरे इत्यादी मान्यवरांच्या शुभहस्ते सर्व विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले.

Advertisement

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गुलाब वरघडे यांच्या विशेष प्रयत्नातून हे साहित्य उपलब्ध झाले.

संस्थेच्या सर्व संचालकांचा शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला.

सूत्रसंचालन धिरजकुमार जानराव तर आभार अध्यक्ष संभाजी ढोरे यांनी मानले.सरपंच गोरख ढोरे यांनी विद्यार्थ्यांना व संस्थेला शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक राजू भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमलिंग रेवणशेट्टे,सरोजा अंबुलगे व पूजा राऊत इत्यादी शिक्षकांनी केले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page