*रोटरी क्लब पुणे ईस्टचा पहिला सेवा प्रकल्प कार्यक्रम संपन्न (सन२०२५-२६)*
पुणे :

रोटरी क्लब ऑफ पुणे ईस्ट आणि फोसेको इंडिया यांचा संयुक्त विद्यमाने सोमवारी(दि.०७)झेडपी शाळा जातेगाव खुर्द व आनंदाश्रम शाळा येथे प्रकल्प कार्यक्रम संपन्न झाला असून हा पहिला सेवा प्रकल्प होता या उपक्रमात एकूण एकूण सुमारे ३०० लाभार्थींनी लाभ घेतला.
या प्रकल्पात जिल्हा परिषद शाळा, जातेगाव खुर्द येथे २ सुंदर ,सुसज्ज वर्ग खोल्या देण्यात आल्या.तसेच
नवीन प्रकल्प उद्घाटन झाले या मध्ये
६५०चौरस फूटांचे बहुउद्देशीय अंगणवाडी केंद्र,
ग्रंथालय व आशा वर्कर्ससाठी संसाधन केंद्र
आरओ वॉटर प्लांट व २४बाय७ वॉटर एटीएम (सुरक्षित शेडसह) दिले या मध्ये लाभार्थी सुमारे अंगणवाडी बालक, माता आणि गावकरी अशा ५०जणांना लाभ मिळाला
यामुळे मुलाना दीर्घकालीन आरोग्य, शिक्षण व पिण्याच्या पाण्याची सुविधा मिळणार आहे
यावेळी ग्रामस्थाने मनोगतात सांगितले की, आम्ही ग्रामस्थ काही रक्कम जमा करू शकलो असतो परंतु ते प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अपुरे पडले असते, फोसेको आणि रोटरी मुळे ते शक्य झाले यामुळे आमचं जीवन सुलभ झाले.

दुसरा प्रकल्पात
आनंदाश्रम शाळा येथे ग्रंथालयासह सुसज्ज वर्गखोली
या मध्ये सुमारे २५० विद्यार्थांनी लाभ घेतला.
या प्रासंगी फोसेको चे एम.डी. श्री. प्रसाद चव्हारे यांनी पुढे जाऊन येथील विद्यार्थ्यांना कंपनीमध्ये संधी देण्याची इच्छा व्यक्त केली.
शाळेच्या मुख्याध्यापक यांनी सांगितले की या उपक्रमास आमच्या शाळेच्या वतीने धन्यवाद आणि शुभेच्छा देतो.
या कार्यक्रमास रोटरी क्लब पुणे ईस्ट सदस्य
तसेच रोटरी डिस्ट्रिक्टचे माजी प्रांतपाल रो.शीतलशाह,रो,राहुल शाह,
रो.प्रकाश कुलकर्णी,रो.विनोद गांधी,
रो. विनय पाटील,
रो. अलका ओसवाल,
रो.संजय डांगे,
रो.सुनील शाह
रो.मनीषा अधिकारी
रो.रौनक शाह
रोटरी क्लब ऑफ शिरूर-शिक्रापूर ३ रोटेरियन
फोसेको इंडीया टीमचे १२ एम.डी. श्री. प्रसाद चव्हारेसह उपस्थित होते.रोटरी शिक्षण, आरोग्य, स्वच्छ पाणी समाजविकास या कार्यास प्रधान्य देत आहे.
रोटरी वर्षाची सुरुवातच एक प्रेरणादायी व शाश्वत प्रकल्पाने झाली.






