*राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषी यांच्या ऊर्जा चरणांचे वडगांव मावळ येथे आगमन* *पालखी मध्ये मिरवणूक आणि पादुका दर्शन सोहळा संपन्न*
वडगाव (मावळ ):

राष्ट्रसंत , आचार्य भगवंत , परम पूज्य श्री आनंद ऋषीजी महाराज साहेब या युगपुरुषांच्या भारतामधील पहिल्या १४ शुभ चिन्ह असलेल्या ऊर्जा चरण पादुकांचे दर्शन आणि जाप शुक्रवार दि. ११ जुलै २०२५ रोजी जैन स्थानक , बाजारपेठ , वडगांव मावळ येथे संपन्न झाला ज्यामध्ये अनेक नागरिकांनी दर्शनाचा लाभ घेतला.
त्रिशूळ , अंकुश , त्रिकोण , मत्स्य , नक्षत्र , ध्वज , उर्ध्व रेखा , डमरू , पर्वत , पद्म , स्वस्तिक , देवज्ञ रेखा , मंदिर , पालखी या १४ शुभ चिन्हांचा समावेश आचार्य भगवंत परम पूज्य श्री आनंद ऋषीजी म. सा. यांच्या चरणांवर होता , याच १४ शुभ चिन्हांच्या ऊर्जा चरणांची वडगांव मावळ येथे जयघोषांमध्ये पालखीमधून मिरवणूक संपन्न झाली त्यानंतर जैन स्थानकामध्ये हे ऊर्जा चरण दर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
श्री जैन स्थानकवासी श्रावक संघाचे अध्यक्ष सुभाषचंद्र मुथा , डॉ.सुनील बाफना , प्रेमराज बाफना , राजेश बाफना , अशोकलाल गुजराणी, सुरेंद्र एस बाफना , झुंबरलाल कर्नावट , विजय बलदोटा , मोतीलाल बाफना, कांतीलाल बाफना , दिलीप मुथा, अमोल बाफना, रोहन मुथा, मनोज बाफना , रमेश गुजराणी , अमित मुथा , प्रतीक सुराणा , राजेंद्र जैन , साहिल बाफना , सुवालाल कुंकूलोळ , गौरव बलदोटा , सहज बाफना, आदी मान्यवर , महिला मंडळ , युथ ग्रुप आणि पाठशाळा ग्रुप चे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते
आनंद दरबार , दत्तनगर , पुणे चे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांचा वडगांव श्री संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला. उमेद बलदोटा , पंकज बाफना , सुनील चोरडिया , नितीन देसरडा यावेळी उपस्थित होते.
ज्यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम संपन्न होत आहे त्या आनंद दरबार , दत्तनगर , पुणे येथील अध्यक्ष बाळासाहेब धोका यांनी प्रास्ताविक केले ज्यात त्यांनी या संपूर्ण उपक्रमाची माहिती दिली.
स्वागतगीत झुंबरलाल कर्नावट आणि प्रीती बाफना यांनी केले.
सूत्रसंचालन मा.नगरसेवक भूषण मुथा यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेश बाफना यांनी केले.
शुक्रवार १८ जुलै २०२५ रोजी आनंद दरबार , दत्तनगर , पुणे येथे या ऊर्जा चरणांची स्थापना होणार असून त्यानिमित्ताने गौतमप्रसादी वडगांव जैन स्थानकवासी श्रावक संघाचे वतीने संपन्न होणार आहे.
जैन स्थानकवासी श्रावक संघ,
युथ ग्रुप , महिला मंडळ , पाठशाळा ग्रुप , वडगांव मावळ यांनी नियोजन केले.






