*वडगांव मावळ येथे प्रस्तावित देहूरोड-लोणावळा सहा पदरी महामार्गावर वडगांव मावळ मधील बाह्यवळण रस्त्यावर तातडीने भुयारी मार्ग किंवा उड्डाणपुल उभारण्याची वडगाव भाजपा ची मागणी* –
वडगाव ( मावळ ):
वडगांव हे मावळ तालुक्याची राजधानी असल्याने येथे शासकिय कामासाठी संपूर्ण तालुक्यातून सर्व सामान्य नागरिक मोठ्या संख्येने असतात. तसेच येथील महामार्गालगत असलेले न्यु इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज यामध्ये सुमारे ३ हजार विदयार्थी याच महामार्गाने ये – जा करत असतात. आजपर्यंत सदर रस्ता ओलांडताना अनेक अपघात झालेले असून त्यामध्ये अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. लहान मुले , ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी आणि नागरिकांना अक्षरश जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे.
या सर्व गोष्टीची दखल घेवुन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या आदेशानुसार १ सप्टेंबर २०१६ रोजी सदर महामार्गावरील अपघात स्थळांना तत्कालीन केंद्रीय परिवहन उत्तर विभागाचे अधिकार जैस्वाल साहेब , रस्ते विकास महामंडळ कार्यकारी अभियंता विश्वनाथ आवटे, संजय गांगुर्डे , आयआरबीचे अधिकारी, स्तुप कंपनीचे व्यवस्थापक कुलकर्णी साहेब यांनी संयुक्तीकरित्या सदर सर्व स्थळांची पाहणी केलेली आहे.
तरी वडगांव मावळ येथुन जाणारा पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्र. (जुना) ४ व नवीन क. ४८ या रस्त्यावर
१) वडगांव अक्षय पॅलेस हॉटेल
२) मातोश्री हॉस्पिटल
३) दिग्विजय कॉलनी ( शिवराज हॉटेल )
४) माळीनगर ( श्रीमंत महादजी शिंदे उद्यानाचे मागे )
ह्या एकूण ४ ठिकाणी भुयारी मार्ग किंवा उड्डाण पुल नियोजित सहा पदरी रस्त्याच्या कामामध्ये समाविष्ट करण्यात यावेत अशी मागणी वडगाव शहर भाजपाने केली आहे.
कार्यकारी अभियंता शैलजा पाटील यांना निवेदन देतांना
वडगांव शहर भाजपा अध्यक्ष संभाजीराव म्हाळसकर , युवा मोर्चा अध्यक्ष आतिश ढोरे , तीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थान चे विश्वस्त सचिव अनंता कुडे , ज्येष्ठ मार्गदर्शक प्रभाकर वाघमारे , मा.नगरसेवक रविंद्र काकडे , किरण म्हाळसकर , रविंद्र म्हाळसकर , युवा उद्योजक चंद्रशेखर म्हाळसकर, विकी म्हाळसकर आदी उपस्थित होते.






