इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयात Careers In Fashion Design विषयावर व्याख्यानाचा कार्यक्रम
तळेगाव दाभाडे:

इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या, इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयातील, विज्ञान विभाग आयोजित Careers In Fashion Design या व्याख्यानाचा कार्यक्रम दिनांक १०/१२/२०२५ रोजी आयोजित करण्यात आला होता
तरी याप्रसंगी व्याख्याते म्हणून राष्ट्रीय फॅशन प्रोद्यौगीक संस्था ,नवी मुंबई ,येथील सहाय्यक प्राध्यापक डॉ. स्नेहा भटनागर आणि सचिन भटनागर लाभले .त्यांनी इयत्ता अकरावी विज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यांना फॅशन डिझाईनिंग या क्षेत्रातील संधींबाबत उपयुक्त मार्गदर्शन केले.
या प्रसंगी इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मलघे सर ,उपप्राचार्य भोसले सर ,विज्ञान विभाग प्रमुख खाडप सर तसेच विज्ञान विभागातील प्राध्यापिका कन्हेरीकर मॅडम, प्रा तेलंग मॅडम,प्रा. कोलते मॅडम,प्रा. प्रतीक्षा शिंदे मॅडम उपस्थित होत्या.
ह्या उपयुक्त कार्यक्रमासाठी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री रामदासजी काकडे तसेच कार्यवाहक माननीय श्री चंद्रकांतजी शेटे यांचे मार्गदर्शन लाभले.
सदर कार्यक्रमाचे निवेदन विज्ञान विभाग प्रमुख खाडप सर यांनी केले तर उपप्राचार्य भोसले सर यांनी आभार मानले.






