कामशेतकर नागरिकांची सर्तकता चोरला पकडुन केले पोलिसाच्या हवाली

SHARE NOW

कामशेत :शहरात एका कापड दुकानात चोरीचा प्रयत्न करणाऱ्या चोराला कामशेतकर नागरिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे. ही घटना रविवारी दिनांक ३ ऑगस्ट २०२५रोजी रात्री कामशेत येथे घडली.या चोरी प्रकरणी कामशेत पोलिसांनी संतोष विनायक गायकवाड (वय २५ रा. अंबरनाथ) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. चोराला पकडत असताना त्याच्या साथीदार चार महिला मात्र पसार झाल्या आहेत. प्राप्त माहितीनुसार कामशेत शहरात श्री छत्रपती शिवाजी चौकात रॉयल कलेक्शन कापड दुकान आहे. तिथे चोरट्यासह चार महिला आल्या होत्या. त्यांनी खरेदीच्या बहाण्याने कपड्यांची चोरी केली. ही बाब दुकानमालक धीरज परमार यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली, तेव्हा तेथील ग्रामस्थ रोहिदास वाळुंज आणि इतर नागरिकांनी चोरट्याला पकडले.नागरिकांच्या सर्तकते चे सर्वत्र कौतुक होत आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page