*कामशेत येथील आश्रम शाळेतील विद्यार्थिनींना गुड टच-बॅड टचचे प्रशिक्षण*

SHARE NOW

मावळ :

रोटरी क्लब ऑफ मावळ आणि कामशेत पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महर्षी कर्वे आश्रम शाळा कामशेत येथील इयत्ता आठवी ते दहावीतील विद्यार्थिनींसाठी गुड टच आणि बॅट टच विषयी मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते. बदलापूर अत्याचार घटनेमुळे पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून मुलींमध्ये लैंगिक शोषणाबाबत जागरूकता व्हावी या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ मावळ व कामशेत पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कामशेत पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील, महर्षी कर्वे शिक्षण संस्थेचे शालेय समिती सदस्य धनंजय वाडेकर मुख्याध्यापिका अनिता देवरे, रोटरी क्लब ऑफ मावळचे अध्यक्ष रो. नितीन दादा घोटकुले उपाध्यक्षा रो.रेश्मा फडतरे, प्रकल्प प्रमुख रो.ॲड.दीपक चव्हाण,व सदस्य रो.सुनील पवार, रो.राजेंद्र दळवी, कामशेत पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार गणेश तावरे,महिला पोलीस कर्मचारी दिपाली शिंदे,निशा लालगुडे यांच्यासह आठवी ते दहावीतील सुमारे 300 विद्यार्थिनी व शिक्षक उपस्थित होते.

Advertisement

उपस्थित विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना रेश्मा फडतरे म्हणाल्या की मुलींना गुड टच- बॅड टच याबाबत आई किंवा घरातील महिलांनी पूर्ण जाणीव करून द्यावी, मुलींना घडणाऱ्या अत्याचार व लैंगिक शोषणापासून जागृत करावे. यावेळी बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ म्हणाले पालकांनी मुलींबरोबर संवाद साधून समाजात वावरताना चांगल्या गोष्टी व वाईट गोष्टी याची जाणीव करून द्यावी तसेच काही चुकीच्या घटना आपल्या निदर्शनास आल्यास त्वरित कोणालाही न घाबरता जवळच्या पोलीस ठाण्याला आपल्या मदतीसाठी कळवावे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेमकला पाठक यांनी केले. याप्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष रो.नितीन दादा घोटकुले रो.ॲड.दीपक चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.तर आभार अनिता देवरे यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन रोटरी क्लब ऑफ मावळ,कामशेत पोलीस स्टेशन व महर्षी कर्वे आश्रम शाळा कामशेत यांनी केले होते


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page