वडगाव शहरातील सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून CCTV कॅमेरे बसविण्यात यावेत – सायली म्हाळसकर

वडगाव मावळ दिनांक -३ वडगाव शहर हे मावळ तालुक्याची ऐतिहासिक व प्रशासकीय राजधानी आहे. येथे अनेक छोटी-मोठी प्रशासकीय कार्यालये असल्याने शासकीय कामाच्या निमित्ताने तालुक्यातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर राबता असतो.

त्याचप्रमाणे मागील काही काळापासून वडगाव शहर झपाट्याने विस्तारत आहे. अनेक छोटे-मोठे गृह प्रकल्प या ठिकाणी निर्माण होत आहेत. राहणीमानाच्या दृष्टीने सुरक्षित शहर म्हणून नागरिक वडगाव शहराला प्राधान्य देत आहेत.

अलीकडच्या काळात समाजात गुन्हेगारीचा आलेख वाढता असल्याकारणाने नागरिकांचा व त्यांच्या मालमत्तेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरात सीसीटीव्ही बसविणे अत्यावश्यक आहे.

Advertisement

शाळांच्या परिसरात लहान मुली, नोकरीच्या ठिकाणी महिलांवर होणारे लैंगिक अत्याचार, चोरी लूटमार, वाढते अपघात यांचा वेळीच योग्य पद्धतीने तपास होण्याच्या दृष्टीने वडगाव शहरात सार्वत्रिक ठिकाणी सीसीटीव्ही बसविल्यास वरील सर्व घटनांचा शोध लावण्यास अथवा तपास करण्यास प्रशासनाला सहाय्य होईल.

तसेच रस्त्यावर कचरा, राडारोडा टाकणा-या नागरिकांना समज देणे, त्यांना योग्य तो दंड आकारणे सोयीचे होईल अशा विषयाचे निवेदन उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर यांनी मुख्याधिकारी प्रवीण निकम यांना आज दिले यावेळी राणी म्हाळसकर मा.युवती अध्यक्षा भाजपा मावळ,चैताली म्हाळसकर,सपना म्हाळसकर,काजल ढोरे,डॉ.आरती परदेशी आदी महिला उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page