“ज्येष्ठांचे आरोग्य – रोटरीची जबाबदारी! तळेगाव MIDC रोटरी क्लबतर्फे मोफत हेल्थ चेकअप शिबिर संपन्न”

SHARE NOW

तळेगाव स्टेशन :

रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम.आय.डी.सी. चे संस्थापक अध्यक्ष रो. संतोषजी खांडगे यांच्या विशेष सहकार्याने रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम.आय.डी.सी. आणि पुष्पलता डी. वाय. पाटील हॉस्पिटल, आंबी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत हेल्थ चेकअप शिबिर बुधवार, दि. 10 डिसेंबर 2025 रोजी इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघ हॉल, वतननगर येथे आयोजित करण्यात आले.

 

शिबिरात एकूण 65 ज्येष्ठ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष रो. प्रवीण भोसले यांनी केले. स्वागत व सत्कार सोहळ्यात अध्यक्ष रो. प्रवीण भोसले, उपस्थित सर्व रोटरी सदस्य तसेच पुष्पलता डी.वाय. पाटील हॉस्पिटल आंबी यांची टीम यांचा गौरव करण्यात आला.

Advertisement

 

प्रकल्प प्रमुख रो. युवराज बढे यांनी प्रकल्पाची माहिती दिली व “ज्येष्ठ नागरिक मनाने सदैव तरुण असतात; फक्त नियमित आरोग्य तपासणी आवश्यक,” असे सांगत आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.

 

हॉस्पिटलचे प्रतिनिधी शुभम शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन ज्येष्ठ नागरिक देशपांडे यांनी तर आभार प्रदर्शन भोजने सर यांनी केले.

 

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरीचे खालील सदस्यांचे विशेष योगदान लाभले :

 

1. रो. प्रवीण भोसले

 

2. रो. संदीप मगर

 

3. रो. विन्सेंट सालेर

 

4. रो. युवराज बढे

 

5. रो. सचिन कोळवणकर

 

6. रो. दशरथ जांभुळकर

 

7. रो. अजय पाटील


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page