*सह्याद्री इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा.*

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

Advertisement

मस्करनेस कॉलनी तळेगाव दाभाडे येथील सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. रिटायर्ड पोलीस उपअधीक्षकक्षक राजेंद्र गणपती पाटील प्रमुख पाहुणे म्हणून लाभले त्यांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि झेंडावंदन करण्यात आले. संस्थापक गणेश भेगडे, अध्यक्ष सुनील भेगडे, उपाध्यक्ष विजय गरुड, सचिव दत्तात्रय नाटक, अरुण भेगडे, रामराव जगदाळे, संतोष दाभाडे, राहुल गोळे, विलास भेगडे संस्थेचे सर्व सदस्य, मुख्याध्यापिका रंजिता थंपी, उपमुख्याध्यापिका सावनी दिवाकर कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते. जम्बोरी आणि राज्यपुरस्कार स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा सत्कार आंतरशालेय विविध सांस्कृतिक स्पर्धांमध्ये बक्षीसे मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार. देशभक्तीपर गीत, देशभक्तीपर नृत्य, शास्त्रीय नृत्य व प्राथमिक गटातून गार्गी केशव निकम मोठा गट, श्रावणी गोडसे ८वी, दिशा जामदार दहावी या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनावरती अप्रतिम भाषण केले. प्राध्यापक प्रमुख पाहुणे संस्था सदस्य यांनी आपली मनोगते मांडली. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना व संस्थेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाखा नाईक, ऋग्वेद अराणके या विद्यार्थ्यांनी व कालिंदी कुलकर्णी व स्मितल रहाळकर या शिक्षकांनी केले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page