रत्नमाला करंडे यांची मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी नियुक्ती.
देहू :
देहू नगरीच्या माजी सरपंच रत्नमाला करंडे यांची मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती झाली. हे नियुक्तीपत्र पुणे जिल्हाध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ बापू शेवाळे, जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम, तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ यांच्या उपस्थित देण्यात आले. याप्रसंगी अतुल राऊत, विशाल वहिले, प्रदीप काळोखे, संदीप शिंदे, अमित घेनंद, विकास परंडवाल इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.