*छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन*
तळेगाव दाभाडे :
श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये दिनांक 26 जून 2025 रोजी राजर्षी शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात शालेय मुख्याध्यापिका सौ.रेणू शर्मा,पर्यवेक्षिका सौ.विजयमाला गायकवाड यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या फोटोस पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली.
लोकराजा शाहू महाराजांच्या कार्याला उजाळा मिळावा; तसेच कार्याचा गुणगौरव व्हावा ; त्यांच्या कार्याचे ज्ञान विद्यार्थ्यांना देण्याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी शाहू महाराजांची व्यक्तिरेखा सादर केली.
इ.सातवी ‘ब’ मधील विद्यार्थीनी कु.स्वरा यादव हिने शाहू महाराजांच्या कार्याची माहिती दिली.
बहुजन समाजाला सोबत घेऊन जाणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनचरित्रा विषयीची माहिती आपल्या मनोगतातून शालेय शिक्षिका सौ.महिमा सुंदरराज यांनी दिली.
राजर्षी शाहू महाराजांची प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी एकता,समता, बंधुता या मूल्यांचा अवलंब आपल्या जीवनात करावा असा कानमंत्र शालेय मुख्याध्यापिका सौ.रेणू शर्मा यांनी विद्यार्थ्यांना दिला.
सदर कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन शालेय मुख्याध्यापिका सौ.रेणू शर्मा, पर्यवेक्षिका सौ. विजयमाला गायकवाड,सर्व शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन शालेय शिक्षिका सौ.प्रतिभा शिरसाट केले.
श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री.संतोष खांडगे, शालेय समिती अध्यक्षा सौ.रजनीगंधा खांडगे, उपाध्यक्ष श्री.दादासाहेब उर्हे, कार्याध्यक्ष श्री.बाळासाहेब शिंदे, सचिव श्री.मिलिंद शेलार सर आदींनी विद्यार्थ्यांनी राजश्री शाहू महाराजांचे विचार आत्मसात करावे असा संदेश दिला .